अबब ! नागपुरात फुलला उत्सव तब्बल २५ हजार फुलझाडांचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2017 10:54 AM2017-12-04T10:54:05+5:302017-12-04T10:57:16+5:30

अशाच निरनिराळ्या सुंदर फुलांचे आकर्षक प्रदर्शन हिस्लॉप महाविद्यालयात सुरू आहे. देशभरातील १०० पेक्षा जास्त प्रकारच्या २५ हजार फुलझाडांनी महाविद्यालयाचा परिसर प्रदर्शनासाठी सजविण्यात आला आहे.

The flowering ceremony of 25 thousand flowers in Nagpur | अबब ! नागपुरात फुलला उत्सव तब्बल २५ हजार फुलझाडांचा

अबब ! नागपुरात फुलला उत्सव तब्बल २५ हजार फुलझाडांचा

Next
ठळक मुद्दे सुंदर फुलांचे आकर्षक प्रदर्शन हिस्लॉप महाविद्यालयात सुरू

आॅनलाईन लोकमत
नागपूर:
वसंत हा जसा पानगळीनंतर झाडांना नवी पालवी येण्याचा ऋतू तसाच शरद हा फुलांच्या बहरण्याचा ऋतू. थंडीची चाहूल लागली की उमललेल्या कळ्यांची फुले होतात. निसर्गाचा हा अनोखा नजराणा कुणाला आवडणार नाही. अशाच निरनिराळ्या सुंदर फुलांचे आकर्षक प्रदर्शन हिस्लॉप महाविद्यालयात सुरू आहे. देशभरातील १०० पेक्षा जास्त प्रकारच्या २५ हजार फुलझाडांनी महाविद्यालयाचा परिसर प्रदर्शनासाठी सजविण्यात आला आहे. गुलाब, शेवंती, जाई, सिलोशिया, डाईअ‍ॅन्थस, मेरीगोल्ड, जिनीया, पिटूनिया, झेंडू, मोगरा अशा ओळखीच्या फुलांसह अनेक नवीन प्रकारची फुलेही इथे आहेत. नागरिक मोठ्या संख्येने येथे भेट देत असून विविध रोपेही आवडीने खरेदी करत आहेत.

Web Title: The flowering ceremony of 25 thousand flowers in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती