पशुवैद्यक क्षेत्रातील उद्योजकतेच्या संधी युवकांपर्यंत पोहोचवा : महादेव जानकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2019 10:45 PM2019-07-13T22:45:42+5:302019-07-13T22:47:42+5:30

पशुवैद्यक क्षेत्राचा संतुलित प्रादेशिक विकास साधत असताना विविध पशुवैद्यक क्षेत्रातील उद्योजकतेच्या संधी युवा पशुपालक, बेरोजगार तरुण व ग्रामीण महिलांपर्यंत पोहोचविणे काळाची गरज असल्याचे मत पशुसंवर्धन, दुग्धविकास आणि मत्स्य व्यवसाय मंत्री महादेव जानकर यांनी व्यक्त केले.

Extend the opportunities of entrepreneurship in the Veterinary sector to the youth: Mahadev Jankar | पशुवैद्यक क्षेत्रातील उद्योजकतेच्या संधी युवकांपर्यंत पोहोचवा : महादेव जानकर

पशुवैद्यक क्षेत्रातील उद्योजकतेच्या संधी युवकांपर्यंत पोहोचवा : महादेव जानकर

googlenewsNext
ठळक मुद्दे महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या राष्ट्रीय परिषदेचा समारोप

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पशुवैद्यक क्षेत्राचा संतुलित प्रादेशिक विकास साधत असताना विविध पशुवैद्यक क्षेत्रातील उद्योजकतेच्या संधी युवा पशुपालक, बेरोजगार तरुण व ग्रामीण महिलांपर्यंत पोहोचविणे काळाची गरज असल्याचे मत पशुसंवर्धन, दुग्धविकास आणि मत्स्य व्यवसाय मंत्री महादेव जानकर यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर यांच्यावतीने ‘पशुवैद्यक शास्त्रातील प्रगती तसेच शेतकऱ्यांची समृद्धता’ या विषयावर तीन दिवसीय राष्ट्रीय परिषद महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती. या परिषदेच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूरचे कुलगुरु प्रा. डॉ. एम. एम पातुरकर, अपर जिल्हाधिकारी तथा कुलसचिव चंद्र्रभान पराते, नियोजन आयोगाचे पूर्व सदस्य प्रा. डॉ. व्ही. व्ही. सदामते, इंडियन व्हेटरनरी एक्सटेन्शन फोरमचे अध्यक्ष प्रा. डॉ. एस. राम कुमार, सरचिटणीस प्रा. डॉ. के. सी. वीरण्णा, नागपूर पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता प्रा. डॉ आर. के. अंबाडकर उपस्थित होते.
महादेव जानकर म्हणाले, पशुवैद्यक क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी राज्यशासन प्रयत्नशील आहे. पशुवैद्यक क्षेत्राचा संतुलित प्रादेशिक विकास साधत असताना पशुवैद्यक क्षेत्रीतील उद्योजकतेच्या संधीची कवाडे युवा पशुपालक, बेरोजगार तरुण व ग्रामीण महिलांसाठी खुली करण्यासाठी राज्य शासन विविध धोरणांची अंमलबजावणी करीत आहे. संचालन सहाय्यक प्राध्यापक डॉ. अमोल पाटील यांनी तर आभार आयोजन समितीचे सचिव डॉ. एस. पी. लांडगे यांनी मानले.
पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या विस्ताराची गरज
महादेव जानकर यांनी यावेळी पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचा विस्तार करण्याची गरज असल्याचे सांगितले. ते म्हणाले, कृषी विभागाचे राज्यामध्ये चार विद्यापीठे आहे. परंतु पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ राज्यात केवळ नागपूरला आहे. तेव्हा याचा विस्तार करण्याची गरज आहे. तसेच कृषी विभागाच्या धर्तीवर कुक्कुटपालन, मेंढी व शेळी पालन करणाऱ्या पशुपालकांना पशु व त्यांचे आजार, उपचार याबाबत माहिती देण्यासाठी एसएमएस प्रणाली विकसित करावी. पशुवैद्यक क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान, शेतीपयोगी नवनवीन माहिती, नाविन्यपूर्व उपक्रम जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे काळाची गरज असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

Web Title: Extend the opportunities of entrepreneurship in the Veterinary sector to the youth: Mahadev Jankar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.