उत्साह अन् कलेचा नेत्रदीपक सोहळा, आंतरराज्यीय दांडिया स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2017 04:32 AM2017-11-21T04:32:31+5:302017-11-21T04:33:45+5:30

नागपूर : प्रसिद्ध गायक कुणाल गांजावालाच्या मधुर गाण्याने उत्साहाला आलेली भरती...

Enthusiasm and art spectacle, Inter-State Dandiya contest | उत्साह अन् कलेचा नेत्रदीपक सोहळा, आंतरराज्यीय दांडिया स्पर्धा

उत्साह अन् कलेचा नेत्रदीपक सोहळा, आंतरराज्यीय दांडिया स्पर्धा

Next

नागपूर : प्रसिद्ध गायक कुणाल गांजावालाच्या मधुर गाण्याने उत्साहाला आलेली भरती... प्रचंड जल्लोष... तरुणाईने दिलेली मनसोक्त दाद... कार्यक्रमस्थळी युवक-युवतींनी तालावर धरलेला फेर, दांडियाच्या तालावर थिरकणारे प्रेक्षक... प्रचंड उत्साहाचे वातावरण... त्यात प्रसिद्ध अभिनेत्री अमृता राव हिने प्रेक्षकांशी साधलेला संवाद... उत्कृष्ट सजविलेला रंगमंच आणि आकर्षक रंगीबेरंगी प्रकाशझोतांनी उजळून जाणारा आसमंत... अत्याधुनिक ध्वनियंत्रणेवर मदहोश करणारे संगीत आणि हवीहवीशी वाटणारी मंद वाºयासह अंगावर झेपावणारी थंडी.... अशा भारावलेल्या वातावरणात आंतरराज्यीय धमाल दांडिया स्पर्धेच्या रूपातील ऊर्जा, उत्साह अन् कलेचा नेत्रदीपक सोहळा रविवारी चिटणीस पार्क येथे पार पडला.
लोकमत सखी मंच, कुसुमताई बोदड लोकसेवा प्रतिष्ठान व भोजवानी यांच्या सहकार्याने लोकमत सखी मंचच्या १७व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित आंतरराज्यीय धमाल दांडिया स्पर्धेची अंतिम फेरी रंगतदार ठरली. लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापक संपादक आणि ज्येष्ठ स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलालजी दर्डा, लोकमत सखी मंचच्या अध्यक्षा दिवंगत ज्योत्स्ना दर्डा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला प्रारंभ करण्यात आला.
याप्रसंगी राज्याचे ऊर्जामंत्री व नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, लोकमत एडिटोरियल बोर्डचे चेअरमन, माजी खासदार विजय दर्डा, प्रसिद्ध गायक कुणाल गांजावाला, प्रसिद्ध अभिनेत्री अमृता राव, आ. अनिल सोले, आ. सुधाकर कोहळे, आ. सुधाकर देशमुख, आ. डॉ. मिलिंद माने, आ. परिणय फुके, भाजपा नेते जयप्रकाश गुप्ता, महापौर नंदा जिचकार, ज्येष्ठ नगरसेवक संदीप जोशी, नगरसेविका परिणीता फुके, पोलीस उपायुक्त नीलेश भरणे, दीपाली भरणे, पोलीस उपायुक्त (वाहतूक) रवींद्र परदेशी, बँक आॅफ इंडियाचे ए. श्रीधर, कुसुमताई बोदड लोकसेवा प्रतिष्ठानच्या संचालिका आरती बोदड, डॉ. रिचाज युनिक क्लिनिकच्या संचालिका डॉ. रिचा जैन, रोकडे ज्वेलर्सचे प्रमुख राजेश रोकडे, गो-गॅस इलाईटचे संचालक नितीन खारा, ‘लोकमत’चे संचालक (परिचालन) अशोक जैन आदी उपस्थित होते.
>गोव्याने पटकावला प्रथम क्रमांक
अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या धमाल दांडियाच्या अंतिम फेरीत दमदार सादरीकरण करीत गोव्याच्या चमूने प्रथम क्रमांक पटकावला. त्यांना ५१ हजार रुपये व आकर्षक ट्रॉफी प्रदान करण्यात आली. द्वितीय पुरस्कार जळगावच्या चमूने प्राप्त केला. ३१ हजार व आकर्षक ट्रॉफीने त्यांना सन्मानित करण्यात आले. तृतीय पुरस्कार भंडाºयाच्या चमूला मिळाला. २१ हजार व आकर्षक ट्रॉफी त्यांना प्रदान करण्यात आली. नृत्य, नेपथ्य, वेशभूषा, रंगभूषा अशा सर्वच बाबतींत चारही चमूंनी एकमेकांना जोरदार लढत दिली. दैत्यराज आणि महाकालीचे युद्ध, कृष्णाचे गोवर्धन पर्वत उचलणे असे अनेक प्रसंग या स्पर्धकांनी अतिशय सुंदर साकारले. भंडाºयाच्या चमूचे हे देखणे सादरीकरणही प्रेक्षकांना भावले.
>लोकमत सखी मंचच्या १७व्या वर्धापन दिनानिमित्त रविवारी नागपुरात आयोजित आंतरराज्यीय धमाल दांडिया स्पर्धा-२०१७च्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित लोकमत एडिटोरियल बोर्डचे चेअरमन, माजी खासदार विजय दर्डा, प्रसिद्ध अभिनेत्री अमृता राव, प्रसिद्ध गायक कुणाल गांजावाला, नगरसेविका परिणीता फुके, पोलीस उपायुक्त नीलेश भरणे, दीपाली भरणे, पोलीस उपायुक्त (वाहतूक) रवींद्र परदेशी, बँक आॅफ इंडियाचे ए. श्रीधर यांच्यासह मंचावर उपस्थित कुसुमताई बोदड लोकसेवा प्रतिष्ठानच्या संचालिका आरती बोदड, डॉ. रिचाज युनिक क्लिनिकच्या संचालिका डॉ. रिचा जैन, रोकडे ज्वेलर्सचे प्रमुख राजेश रोकडे व कॉन्फिडेन्स ग्रुपचे चेअरमन नितीन खारा.

Web Title: Enthusiasm and art spectacle, Inter-State Dandiya contest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :nagpurनागपूर