मॉर्निंग वॉक करताना सेवानिवृत्त अधिकाऱ्यास ट्रकने चिरडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2017 08:36 PM2017-11-30T20:36:55+5:302017-11-30T20:44:15+5:30

मॉर्निंग वॉक करण्यास गेलेल्या सेवानिवृत्त अधिकाऱ्यास भरधाव ट्रकने धडक दिली. त्यात त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. हा अपघात गुरुवारी (दि. ३०) सकाळी ६ वाजताच्या सुमारास सावनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर झाला.

During the morning walk, the retired officer was crushed by the truck | मॉर्निंग वॉक करताना सेवानिवृत्त अधिकाऱ्यास ट्रकने चिरडले

मॉर्निंग वॉक करताना सेवानिवृत्त अधिकाऱ्यास ट्रकने चिरडले

Next
ठळक मुद्देनागपूर जिल्ह्यातील सावनेर कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर झाला अपघातगावकऱ्यांच्या सतर्कतेने ट्रकचालक ट्रकसह ताब्यात

आॅनलाईन लोकमत
नागपूर : मॉर्निंग वॉक करण्यास गेलेल्या सेवानिवृत्त अधिकाऱ्यास भरधाव ट्रकने धडक दिली. त्यात त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. हा अपघात गुरुवारी (दि. ३०) सकाळी ६ वाजताच्या सुमारास सावनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर झाला.
मोहन अजाबराव भोसले (६०, रा. सहकारी जिनिंग फॅक्टरीसमोर, सावनेर) असे मृताचे नाव आहे. ते सार्वजनिक बांधकाम विभागातून सेवानिवृत्त झाले होते. दररोज ते ‘मॉर्निंग वॉक’साठी जात. नेहमीप्रमाणे गुरुवारीही ते मॉर्निंग वॉकसाठी गेले. दरम्यान कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर दूध घेऊन येणाऱ्या  एमएच-४०/एके-१४७२ क्रमांकाच्या भरधाव ट्रकने त्यांना जबर धडक दिली. त्यात ट्रकने त्यांना १५ ते २० फुटापर्यंत फरफटत नेले. त्यातच ते गंभीररीत्या जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला. त्यांना शासकीय रुग्णालयात नेले असता डॉ. अशोक मुंडे यांनी तपासून मृत घोषित केले.
अपघात होताच ट्रकचालकाने ट्रकसह घटनास्थळाहून पळ काढला. ही बाब नागरिकांनी सावनेर पोलिसांच्या निदर्शनास आणून देताच पोलिसांनी पांढुर्णा रोडवर ट्रकचालक प्रवीण आनंदराव कडस्कर (२४, रा. बोरखेडी, नागपूर) याला अटक केली. त्याच्या ताब्यातून ट्रक जप्त केला. याप्रकरणी सावनेर पोलिसांनी भादंविच्या कलम २७९, ३०४ (अ) अन्वये गुन्हा दाखल केला. तपास सहायक पोलीस निरीक्षक सचिन यादव करीत आहे.

Web Title: During the morning walk, the retired officer was crushed by the truck

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात