थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2018 09:55 PM2018-02-08T21:55:52+5:302018-02-08T21:57:44+5:30

वीज बिलापोटी ग्राहकांकडील असलेली थकबाकी पूर्णत: वसूल करण्यासाठी ‘शून्य थकबाकी’ मोहीम आक्रमकतेने राबविण्याचे स्पष्ट निर्देश महावितरणच्या नागपूर परिक्षेत्राचे प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत यांनी दिले.

Disrupt the power supply of the outstanding customers! | थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करा !

थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करा !

Next
ठळक मुद्देपरिमंडळ आढावा बैठक : भालचंद्र खंडाईत यांचे निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वीज बिलापोटी ग्राहकांकडील असलेली थकबाकी पूर्णत: वसूल करण्यासाठी ‘शून्य थकबाकी’ मोहीम आक्रमकतेने राबविण्याचे स्पष्ट निर्देश महावितरणच्या नागपूर परिक्षेत्राचे प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत यांनी दिले. विद्युत भवनातील महावितरणच्या मुख्यालयात आयोजित नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, अमरावती आणि अकोला या पाचही परिमंडळाच्या आढावा बैठकीप्रसंगी त्यांनी हे निर्देश दिले.
घरगुती, वाणिज्यिक आणि औद्योगिक ग्राहकांसोबतच सार्वजनिक पाणीपुरवठा योजना, पथदिवे यांच्यावर वीज बिलापोटी असलेल्या चालू आर्थिक वर्षातील संपूर्ण थकबाकीसोबतच मागील आर्थिक वर्षातील थकबाकी वसूल करा, थकबाकी भरण्यास नकार देणाऱ्या ग्राहकांचा वीजपुरवठा नियमानुसार खंडित करा, प्रत्येक लाईनस्टाफला थकबाकी वसुली आणि वीजपुरवठा खंडित करण्याचे दैंनंदिन लक्ष्य द्या, थकबाकी वसुली अथवा वीजपुरवठा खंडित असे दोनच पर्याय ग्राहकापुढे ठेवा, थकबाकी वसुलीत हयगय करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यासोबतच काम करण्याशिवाय पर्याय नसल्याचा संदेश सर्व कर्मचाऱ्यांपर्यंत देण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी केल्या. प्रत्येक कार्यकारी अभियंत्यांनी थकबाकी वसुलीसाठी रितसर योजना तयार करा. सोबतच वीजप्रवाहामुळे जंगली प्राण्यांचे होणारे मृत्यू टाळण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचनाही केल्या.
या बैठकीला नागपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता रफीक शेख, चंद्रपूर परिमंडळाचे दिलीप घुगल, अकोला परिमंडळाचे अरविंद भादीकर, मुख्य अभियंता गुणवत्ता नियंत्रण सुहास रंगारी, गोंदिया परिमंडळाचे प्रभारी मुख्य अभियंता लीलाधर बोरीकर, अमरावती परिमंडलाचे प्रभारी मुख्य अभियंता सुहास मेत्रे, महाव्यवस्थापक (वित्त व लेखा) शरद दाहेदार यांचेसह परिक्षेत्रांतर्गत असलेले अधीक्षक अभियंते, कार्यकारी अभियंते, लेखा अधिकारी उपस्थित होते.
डॅशबोर्डच्या आधारे पेपरलेस बैठक
आजची ही बैठक केवळ डॅशबोर्डवर उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारावर झाल्याने पेपरलेस महावितरणची प्रभावी वाटचाल सुरू झाली आहे. ही बैठक डॅशबोर्ड वर आधारित होणार असल्याची पूर्वकल्पना सर्व संबंधितांना देण्यात आल्याने कुठलाही कागद, नोंदी, अहवाल, फाईल्स आदीचा पसारा न मांडता प्रत्येकाने डॅशबोर्डवरील संबंधित माहिती अत्यंत उत्साहीपणे मांडली. महावितरणच्या प्रत्येक अभियंता, अधिकारी व कर्मचाऱ्यांला डॅशबोर्डचा वापर प्रभावीपणे करता यावा यासाठी यापुढील प्रत्येक बैठका डॅशबोर्डवरील माहितीच्या आधारावरच घेण्यात येतील असे प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत यांनी सांगितले.

Web Title: Disrupt the power supply of the outstanding customers!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.