डॉक्टर-रुग्णांमधील संवाद हा सुसंवाद हवा : कांचन गडकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2018 12:27 AM2018-09-30T00:27:06+5:302018-09-30T00:27:55+5:30

रुग्ण कितीही शिक्षित असलातरी रुग्णांचा डॉक्टरांवर फार मोठा विश्वास असतो. डॉक्टर म्हणतील तसे रुग्ण वागतात. यामुळे दोन्हीकडून या विश्वासाला तडा जाणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे, दोघांमधील संवाद हा सुसंवाद व्हायला हवा. यातूनच डॉक्टर व रुग्णांच्या नात्यातील वीण आणखी घट्ट होईल, असे विचार कांचन गडकरी यांनी येथे व्यक्त केले.

Dialogues between doctors and patients will be harmony: Kanchan Gadkari | डॉक्टर-रुग्णांमधील संवाद हा सुसंवाद हवा : कांचन गडकरी

डॉक्टर-रुग्णांमधील संवाद हा सुसंवाद हवा : कांचन गडकरी

googlenewsNext
ठळक मुद्दे ‘नार्चिकॉन-२०१८’चे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रुग्ण कितीही शिक्षित असलातरी रुग्णांचा डॉक्टरांवर फार मोठा विश्वास असतो. डॉक्टर म्हणतील तसे रुग्ण वागतात. यामुळे दोन्हीकडून या विश्वासाला तडा जाणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे, दोघांमधील संवाद हा सुसंवाद व्हायला हवा. यातूनच डॉक्टर व रुग्णांच्या नात्यातील वीण आणखी घट्ट होईल, असे विचार कांचन गडकरी यांनी येथे व्यक्त केले.
‘नॅशनल असोसिएशन आॅफ रिप्रोडक्टीव्ह अ‍ॅण्ड चाईल्ड हेल्थ आॅफ इंडिया’ (नार्चिकॉन) नागपूर शाखा व ‘एन.के.पी. साळवे आयुर्विज्ञान संस्था’ यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारपासून १४ व्या जागतिक भारतीय ‘नार्चिकॉन-२०१८’चे आयोजन करण्यात आले आहे. याच्या उद्घाटनाप्रसंगी त्या बोलत होत्या. व्यासपीठावर आयोजन समितीच्या अध्यक्ष डॉ. निर्मला वझे, डॉ. वसंत खळतकर, आयोजन सचिव डॉ. प्रगती खळतकर, डॉ. क्षमा केदार, डॉ. सुलभा जोशी, नार्चिच्या सचिव डॉ. अलका मुखर्जी, डॉ. वीणा आचार्य आणि फॉक्सीचे अध्यक्ष डॉ. जयदीप मल्होत्रा, डॉ. सुब्रता डॉन उपस्थित होते.
गडकरी म्हणाल्या की, पूर्वी ‘फॅमिली डॉक्टर’ ही संकल्पना होती. यामुळे डॉक्टर आणि रुग्ण यांच्यामध्ये घरच्यासारखे संबंध असायचे. सध्या ‘सुपर स्पेशालिटी’मुळे ही संकल्पना मागे पडत आहे. यामुळे याचे जतन व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले. प्रास्ताविक डॉ. खळतकर यांनी केले. नार्चिचे कार्य डॉ. वझे यांनी सांगितले. स्मरणिका, नार्चि बुलेटीन आणि पेलविक अ‍ॅनाटॉमी यांचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. संचालन डॉ. स्मिता देवळे आणि डॉ. वैद्य सुतवणे यांनी केले. दिवसभरातील विविध सत्रात बालरोग व स्त्रीरोग शास्त्रातील विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. सकाळच्या सत्रात माता व बालमृत्यू जनजागृतीला घेऊन रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. त्याच प्रमाणे वैद्यकीय प्रकरणांवर ‘म्युट कोर्ट’चे सादरीकरण करण्यात आले.

डॉ. बोधनकर व डॉ. चौरिसया यांना जीवनगौरव पुरस्कार
‘नार्चि’तर्फे देण्यात येणारा जीवनगौरव पुरस्कार यावर्षी प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ. उदय बोधनकर आणि डॉ. छाया चौरसिया यांना प्रदान करण्यात आला. तर डॉ. प्रगती खळतकर यांना उत्कृष्ट कार्याचा पुरस्कार देण्यात आला. पुरस्काराचे वितरण डॉ. सुब्रता डॉन व डॉ. जयदीप मल्होत्रा यांच्या हस्ते करण्यात आले.

Web Title: Dialogues between doctors and patients will be harmony: Kanchan Gadkari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.