नागपुरात ११ लाखांच्या खंडणीसाठी डेव्हलपर्सचे अपहरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2017 11:30 PM2017-12-02T23:30:24+5:302017-12-02T23:34:19+5:30

राहुल आग्रेकर अपहरण हत्याकांडाच्या थरारक घटनाक्रमातून नागपूरकर अद्याप सावरायचे असताना हिंगण्यातील एका डेव्हलपर्सचे अपहरण करून त्याला एमआयडीसीतील बंद कंपनीत बंधक बनविण्यात आले. मारहाण करून त्याच्याकडून ११ लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली

Developers kidnapped for Rs 11 lakh ransom in Nagpur | नागपुरात ११ लाखांच्या खंडणीसाठी डेव्हलपर्सचे अपहरण

नागपुरात ११ लाखांच्या खंडणीसाठी डेव्हलपर्सचे अपहरण

Next
ठळक मुद्देबंद कंपनीत मारहाणखंडणी देण्याच्या अटीवर सोडले

आॅनलाईन लोकमत
नागपूर : राहुल आग्रेकर अपहरण हत्याकांडाच्या थरारक घटनाक्रमातून नागपूरकर अद्याप सावरायचे असताना हिंगण्यातील एका डेव्हलपर्सचे अपहरण करून त्याला एमआयडीसीतील बंद कंपनीत बंधक बनविण्यात आले. मारहाण करून त्याच्याकडून ११ लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली. खंडणीची रक्कम देण्याचे आश्वासन देत सुनील देवरावजी निंबुळकर (वय ३७) नामक डेव्हलपर्सने हातपाय जोडून अपहरणकर्त्यांच्या तावडीतून आपली सुटका करून घेतली. शनिवारी सायंकाळी ही माहिती चर्चेला आल्याने पुन्हा एकदा उपराजधानीत खळबळ उडाली असून, पोलीस प्रशासनालाही हादरा बसला आहे.
सुनील हिंगण्यातील पंचवटी पार्कमध्ये राहतात. गुरुवारी, ३० नोव्हेंबरला दुपारी २ च्या सुमारास ते अंबाझरीतील रामनगर चौकात उभे होते. एमआयडीसीतील मातोश्रीनगरातील रहिवासी आरोपी तुषार चौहाण, राहुल शर्मा, पंकज सफेलकर आणि त्यांचे साथीदार तेथे सफारी कारमधून आले. त्यांनी सुनीलला जबरदस्तीने आपल्या सफारीत ओढले. एमआयडीसीतील रायसोनी कॉलेजजवळ एमएमसी नावाची बंद पडलेली कंपनी आहे. आतमध्ये नेऊन आरोपींनी सुनीलला मारहाण केली. ११ लाख रुपये तातडीने दे, अन्यथा राहुल आग्रेकरसारखा तुझे कांड करू, तुझ्या परिवारातील सदस्यांवरही हल्ला होईल, अशी धमकी आरोपींनी दिली. आग्रेकर कांडाचे नाव घेताच थरारलेल्या सुनीलने आरोपींचे हातपाय जोडले. मला जाऊ द्या, मी लगेच इकडून-तिकडून ११ लाखांची व्यवस्था करतो, असे म्हणत आरोपींच्या तावडीतून स्वत:ची सुटका करण्यासाठी धडपड केली. आरोपींनी बराच वेळ त्याला बंधक बनवून ठेवल्यानंतर तातडीने रक्कम आणून दे म्हणत, त्याच्या जवळचे पाच हजार रुपये हिसकावुन घेतले. त्यानंतर सुनीलचा मोबाईल आणि गाडीची चावी देऊन धमकी देत त्याला हाकलून लावले.
धावपळ करीत सुनील घरी पोहचला. त्याची अवस्था बघून कुटुंबीयांनी त्याला खोदून खोदून काय झाले, याबाबत विचारणा केली. तेव्हा सुनीलने अपहरण आणि खंडणीसाठी मारहाण केल्याची माहिती घरच्यांना सांगितली. घरच्यांनी त्याला आश्वस्त करीत शुक्रवारी हिंगणा पोलीस ठाण्यात धाव घेतली. घटनाक्रम ऐकून घेतल्यानंतर प्रकरण अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याचे सांगून अंबाझरी पोलिसांनी ती माहिती अंबाझरी ठाण्यात कळविली.

सीसीटीव्हीत घटना कैद
अंबाझरी पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी अंबाझरीतील रामनगर चौकातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात आरोपी मारहाण करून सुनीलला जबरदस्तीने कारमध्ये बसविताना दिसतात. त्यामुळे तांत्रिक का होईना सुनीलचे अपहरण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, आरोपींचा शोध सुरू केला आहे.

आरोपी कुख्यात गुंड
या प्रकरणातील सर्व आरोपी कुख्यात गुंड आहेत. आरोपी राहुलवर हत्या आणि अन्य गंभीर गुन्हे दाखल असून, तुषार तसेच पंकजविरुद्धही अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे. त्यांची हिंगणा, एमआयडीसी परिसरात प्रचंड दहशत असल्याचेही सांगितले जाते.

Web Title: Developers kidnapped for Rs 11 lakh ransom in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.