क्रांतियात्रेतून ज्योतिबा व सावित्रीआई यांना भारतरत्न देण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2018 10:21 PM2018-04-11T22:21:38+5:302018-04-11T22:21:50+5:30

सामाजिक परिवर्तनाचे क्रांतिसूर्य व स्त्री शिक्षणाचे प्रणेते महात्मा ज्योतिराव फुले आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावून सेवाव्रत स्वीकारणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीआई यांच्या अजोड कार्याने देशात सामाजिक क्रांतीची बिजे रोवली. त्यांना देशाचा सर्वोच्च सन्मान भारतरत्न पुरस्काराने सन्मानित गौरव करावा, अशी मागणी जोर धरत आहे. बुधवारी महात्मा फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून या मागणीसाठी सर्व समाज संघटनांच्यावतीने भव्य क्रांतियात्रा काढण्यात आली.

The demand for Bharat Ratna for Jyotiba and Savitri by Kranti Yatra | क्रांतियात्रेतून ज्योतिबा व सावित्रीआई यांना भारतरत्न देण्याची मागणी

क्रांतियात्रेतून ज्योतिबा व सावित्रीआई यांना भारतरत्न देण्याची मागणी

Next
ठळक मुद्दे६० चित्ररथातून घडविले जीवनदर्शन : सर्व समाज संघटनांचा सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सामाजिक परिवर्तनाचे क्रांतिसूर्य व स्त्री शिक्षणाचे प्रणेते महात्मा ज्योतिराव फुले आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावून सेवाव्रत स्वीकारणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीआई यांच्या अजोड कार्याने देशात सामाजिक क्रांतीची बिजे रोवली. त्यांना देशाचा सर्वोच्च सन्मान भारतरत्न पुरस्काराने सन्मानित गौरव करावा, अशी मागणी जोर धरत आहे. बुधवारी महात्मा फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून या मागणीसाठी सर्व समाज संघटनांच्यावतीने भव्य क्रांतियात्रा काढण्यात आली.
महात्मा फुले शिक्षण संस्थेच्या पुढाकाराने राष्ट्रीय  ओबीसी महासंघ, मराठा सेवा संघ, अ.भा. माळी महासंघ, बानाई यांच्यासह बहुजन समाजातील पुरोगामी विचाराने कार्य करणाऱ्या ४० च्या जवळपास सामाजिक संघटनांच्या सहभागाने महात्मा फुले सभागृह, रेशीमबाग येथून ही क्रांतियात्रा काढण्यात आली. ज्योतिबा व सावित्रीआई यांच्यासह शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्याचे दर्शन घडविणारे ६० चित्ररथ या यात्रेत सामील होते. चंदननगर, क्रीडा चौक,राष्ट्रसंत तुकडोजी महाराज चौक, मानेवाडा चौक, उदयनगर, जुना सुभेदार, सक्करदरा चौक, हेडगेवार स्मारक मार्गे रेशीमबागच्या सभागृहात समारोप करण्यात आला. महात्मा फुले शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. अरुण पवार, ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे, अविनाश ठाकरे, डॉ. गिरीश पांडव, प्रमोद मानमोडे, संजय आवटे, डॉ. पी.एस. चंगोले, अशोक चोपडे यांनी  उदबोधन  केले.
या आयोजनात संस्थेचे डॉ. शेषराव उमप, सुरेंद्र आर्य, रवींद्र अंबाडकर, रमेश राऊत, प्रकाश देवते, धनराज फरकाडे, मुकेश घोळसे, अरुण भोयर, शरद चांदोरे, गिरीश देशमुख, नीलय चोपडे, घनश्याम खवले, राजू गाडगे, राजेंद्र पाटील, सुनील चिमोटे, शंकर घोळसे यांचा सहभाग होता. यासह माजी आमदार अशोक मानकर, मोहन मते, आमदार सुधाकर कोहळे, बळवंत जिचकार, कैलास चुटे, नगरसेवक प्रवीण दटके, रमेश सिंगारे, उषा पॅलेट, शीतल प्रशांत कामडे, स्वाती आखतकर, पिंटू झलके, डॉ. छोटू भोयर, सतीश होले, विशाखा मोहड, आरती बुंदे, संजय महाकाळकर, मनोज गावंडे, डॉ. शरयू तायवाडे, सुषमा भड, निर्मला मानमोडे, कल्पना मानकर, वृंदा ठाकरे, सुनीता जिचकार, अनिता ठेंगरे, नंदा देशमुख, साधना बोरकर आदींचा सहभाग होता.

 

Web Title: The demand for Bharat Ratna for Jyotiba and Savitri by Kranti Yatra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.