तंत्र शिक्षण संचालनालयाच्या निर्णयामुळे धावपळ वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 01:27 AM2018-06-15T01:27:47+5:302018-06-15T01:28:02+5:30

तंत्र शिक्षण संचालनालयाने अभियांत्रिकी व औषधनिर्माणशास्त्र, मॅनेजमेंटच्या अभ्यासक्रमासाठी जात पडताळणी प्रमाणपत्र गरजेचे केले आहे. त्यामुळे विद्यार्थी व पालकांची चिंता वाढली आहे.

The decision of the Directorate of Technical Education increased the rushed | तंत्र शिक्षण संचालनालयाच्या निर्णयामुळे धावपळ वाढली

तंत्र शिक्षण संचालनालयाच्या निर्णयामुळे धावपळ वाढली

googlenewsNext
ठळक मुद्देजिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीची ९५ टक्के कामे पूर्ण : दोन महिन्यात ३६०० प्रमाणपत्राचे वितरण

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : तंत्र शिक्षण संचालनालयाने अभियांत्रिकी व औषधनिर्माणशास्त्र, मॅनेजमेंटच्या अभ्यासक्रमासाठी जात पडताळणी प्रमाणपत्र गरजेचे केले आहे. त्यामुळे विद्यार्थी व पालकांची चिंता वाढली आहे. जिल्हा जात पडताळणी समितीच्या कार्यालयात वाढलेली गर्दी ही तंत्र शिक्षण संचालनालयाच्या निर्णयामुळे आहे. असे असले तरी समितीचे प्रमाणपत्र पडताळणीचे ९५ टक्के काम पूर्ण झाले आहे. समितीने प्रमाणपत्र वितरणासंदर्भात मोहीम राबवून गेल्या दोन महिन्यात ३६०० पडताळणी प्रमाणपत्राचे वाटप केले आहे. गेल्या तीन ते चार दिवसात एक हजारच्या जवळपास प्रमाणपत्राचे वितरण केले आहे. समितीचे कामे वेगाने सुरू आहे. पालक व विद्यार्थ्यांनी संयम बाळगावा, सर्वांना प्रमाणपत्र मिळतील असे आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे सदस्य व उपायुक्त आर. डी. आत्राम यांनी केले आहे.
समितीकडे यावर्षी आलेले अर्ज आणि झालेले वितरण
अभियांत्रिकी, वैद्यकीय व मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी जात पडताळणी प्रमाणपत्राची गरज असते. यावर्षी बारावीचे १३००० अर्ज व व्यावसायिक अभ्यासक्रमाचे ५००० अर्ज समितीकडे आले होते. एप्रिल महिन्यापासून समितीने प्रमाणपत्र वितरणाचे काम हाती घेतले. त्यासाठी मोहीम राबविली. एकाच वेळी ८०० विद्यार्थ्यांना प्रमाणपत्राचे वितरण केले. सातत्याने मोहीम राबविल्याने दोन महिन्यात ३६०० प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. तसेच वर्षभर प्रमाणपत्राचे वितरण सुरूच होते. एक हजाराच्या आसपास काही त्रृटीचे प्रस्ताव सोडल्यास जात प्रमाणपत्र पडताळणीचे काम झाले आहे.
पालकांकडून वेळीच दखल नाही
समितीकडून सातत्याने प्रमाणपत्राचे काम सुरू आहे. ज्यांचे प्रमाणपत्र तयार झाले आहे, त्यांना एसएमएसच्या माध्यमातून कळविले आहे. दोन वेळा एसएमएसद्वारे रिमार्इंडसुद्धा केले आहे. त्यानंतर ते घेऊन गेले नाही. अशांना पोस्टाच्या माध्यमातून प्रमाणपत्र पाठविण्यात आले आहे. अर्जातील त्रुटीसंदर्भातही वेळोवेळी एसएमएस करण्यात आले होते. तेव्हा पालकांनी दखल घेतली नाही. ऐन प्रवेशाची वेळ आल्यावर प्रमाणपत्रासाठी गर्दी वाढली आहे.

 दरवर्षी हीच अवस्था असते का?
सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जमातीच्या जात प्रमाणपत्र पडताळणी संदर्भात ६ सप्टेंबर २०१७ ला निर्णय दिला आहे. त्याचा आधार घेत तंत्र शिक्षण संचालनालयाने अर्जासोबत पडताळणी प्रमाणपत्र जोडण्याचा निर्णय घेतला होता. पडताळणी प्रमाणपत्राशिवाय अर्ज स्वीकारले जात नसल्याने विद्यार्थ्यांची धावपळ होत आहे. गेल्यावर्षी महाविद्यालयांनी जात पडताळणी प्रमाणपत्राशिवाय प्रवेश दिले होते. विद्यार्थ्यांकडून ३ महिन्यात प्रमाणपत्र सादर करण्यासंदर्भात अंडरटेकिंग घेतले होते. त्यामुळे विद्यार्थ्यांची धावपळ झाली नाही. विशेष म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने कास्ट व्हॅलिडीटी संदर्भात जो निर्णय दिला आहे, तो अनुसूचित जमातीच्या संदर्भात असल्याची माहिती आहे. परंतु संचालनालयाने यात सर्वच प्रवर्गांना समाविष्ट केले आहे.
 अधिकाऱ्यांवर अतिरिक्त प्रभारामुळे अडचण जाणवते का?
नागपूर जिल्हा जात पडताळणी समितीकडे महाराष्ट्रात सर्वाधिक अर्ज येतात. समितीचे अध्यक्ष हे अप्पासाहेब धुळाज आहे. सदस्य सचिव म्हणून व्ही.बी. वाकुलकर आहे. परंतु त्यांच्याकडे नागपूरबरोबर गोंदिया व वर्धेचासुद्धा प्रभार आहे. त्याचा काहीसा परिणाम कामावर होत आहे.
 विद्यार्थ्यांना मिळणार का प्रमाणपत्र?
विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही, असा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे शनिवारीसुद्धा प्रमाणपत्र वितरणाची मोहीम राबविण्यात येणार आहे. सर्वच विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र मिळतील. पालकांनी, विद्यार्थ्यांनी गोंधळ करू नये.

 

Web Title: The decision of the Directorate of Technical Education increased the rushed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.