नागपूर शहरातील ३८० अतिक्रमणांवर मनपाची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 10:54 PM2021-02-15T22:54:01+5:302021-02-15T22:55:46+5:30

Action against encroachments, nagpur news मनपाच्या अतिक्रमण विरोधी पथकाने सोमवारी शहरातील विविध भागात केलेल्या कारवाईत ३८० अतिक्रमणे हटविली.

Corporation action on 380 encroachments in Nagpur city | नागपूर शहरातील ३८० अतिक्रमणांवर मनपाची कारवाई

नागपूर शहरातील ३८० अतिक्रमणांवर मनपाची कारवाई

Next
ठळक मुद्देअनेक पक्के बांधकामही तोडले : विविध भागात दिवसभर मोहीम

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : मनपाच्या अतिक्रमण विरोधी पथकाने सोमवारी शहरातील विविध भागात केलेल्या कारवाईत ३८० अतिक्रमणे हटविली. रहाटे कॉलनी चौक ते लोकमत चौक आणि बजाज नगर चौक ते आठ रास्ता चौक परिसरातील फुटपाथवर केलेली ५६ अतिक्रमणे या कारवाईत हटविण्यात आली. हनुमान नगर झोन अंतर्गत ऑफिसपासून तर सक्करदरा चौक, जुनी शुक्रवारी, एसडी हॉस्पिटलपर्यंतच्या फुटपाथवरील ७० अतिक्रमणे हटविण्यात आली. नेहरूनगर झोन अंतर्गत भांडे प्लॉट चौकापासून तर दिघोरी नाका चौक, पुढे दिघोरी चौक ते मोठा ताजबाग, शीतला माता मंदिर चौक, भांडे प्लॉट चौकपर्यंतच्या फुटपाथवरील ५७ अतिक्रमणांवर कारवाई करून हटविण्यात आली.

अशीच कारवाई गांधीबाग झोनमध्येही करण्यात आली. ज्योती ठाकूर यांच्या दुमजली इमारतीचा मागील भाग पाडण्यात आला. डिसेंबर-२०२० मध्येच त्यांना अतिक्रमण हटविण्यासंदर्भात मनपाने नोटीस बजावली होती. त्यांनी लक्ष न दिल्याने ही कारवाई मनपाने केली. टांगा स्टँड ते नंगा पुतळा आणि पन्नालाल देवडिया हायस्कूलपर्यंतच्या फुटपाथवरील ७० अतिक्रमणेही हटविण्यात आली. लकडगंज झोन अंतर्गत जलाराम गेट ते चौकेबे स्कूल, मनपा मिनीमाता नगर स्कूल, जैन किराणा स्टोर्स या सर्व मार्गात फुटपाथवरील ३० अतिक्रमणे हटविली. आसीनगर झोन अंतर्गत टेका नाका ते नारी रोडच्या फुटपाथवर करण्यात आलेली अतिक्रमणेही हटविण्यात आली. मंगळवारी झोन अंतर्गत निर्मल नगर, नारी रोडवरील श्रीकृष्ण पराते यांच्या इमारतीचा पॅरापिट तोडण्यात आला. प्रीती कनोजिया यांच्या घराची भिंतही पाडण्यात आली. रंजना चहांदे तसेच अजय डागेरिया यांच्या घराचे पॅरापिट तोडण्यात आले. कडबी चौक ते जिंजर मॉल जरीपटकापर्यंतच्या फुटपाथवरील अतिक्रमणेही हटविण्यात आली.

Web Title: Corporation action on 380 encroachments in Nagpur city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.