विजेचे चालू बिल भरा आणि कनेक्शन सुरू करा- चंद्रशेखर बावनकुळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2017 05:22 PM2017-10-30T17:22:52+5:302017-10-30T17:27:19+5:30

ज्या शेतकऱ्यांकडे विजेचे बील थकीत आहे त्यांनी चालू थकित बिल भरून आपले विद्युत कनेक्शन चालू करून घ्यावे व उर्वरित थकित बिलाचे हप्ते पाडून ते अदा करावेत, अशी शेतकऱ्यांना दिलासादायक योजना राज्याचे उर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी येथे सोमवारी दुपारी पत्रपरिषेदत जाहीर केली.

Complete the electricity bill and start the connection - Chandrasekhar Bavankule | विजेचे चालू बिल भरा आणि कनेक्शन सुरू करा- चंद्रशेखर बावनकुळे

विजेचे चालू बिल भरा आणि कनेक्शन सुरू करा- चंद्रशेखर बावनकुळे

Next
ठळक मुद्देथकित बिलाचे हप्ते ठरविले जातीलशेतकऱ्यांना दिलासामुख्यमंत्री संजीवनी योजना ठरली शेतकऱ्यांसाठी संजीवनी

आॅनलाईन लोकमत
नागपूर: ज्या शेतकऱ्यांकडे विजेचे बील थकीत आहे त्यांनी चालू थकित बिल भरून आपले विद्युत कनेक्शन चालू करून घ्यावे व उर्वरित थकित बिलाचे हप्ते पाडून ते अदा करावेत, अशी शेतकऱ्यांना दिलासादायक योजना राज्याचे उर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी येथे सोमवारी दुपारी पत्रपरिषेदत जाहीर केली. शेतकऱ्यांच्या थकित बिलासाठी तयार केलेली मुख्यमंत्री संजीवनी या नावाची ही नवी योजना शेतकऱ्यांसाठी खरोखरीच संजीवनी ठरावी असा आशावाद त्यांनी यावेळी व्यक्त केला.
या नव्या योजनेंतर्गत नोव्हेंबर महिन्याच्या १ तारखेपर्यंत शेतकऱ्यांनी विजेचे बिल भरावे. चालू बिल सात दिवसांच्या आत भरलं नाही तर त्यांचं विजेचं कनेक्शन कापलं जाऊ शकतं, असा इशाराही उर्जा मंत्र्यांनी यावेळी दिला. याखेरीज शेतकऱ्यांकडे थकबाकी असलेल्या विजेच्या बिलाचे हप्ते करून देण्यात येतील आणि त्यावर दंड व्याज आकारले जाणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले. शेतकऱ्यांनी या योजनाला प्रतिसाद द्यावा व विजेचे बिल भरून योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले आहे.

Web Title: Complete the electricity bill and start the connection - Chandrasekhar Bavankule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.