स्वच्छतेची बोंब;बिल मात्र अव्वाच्या सव्वा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2017 12:12 AM2017-11-14T00:12:54+5:302017-11-14T00:13:20+5:30

स्वच्छतेच्या बाबतीत नागपूर शहर २० व्या क्र मांकावरून १३७ व्या क्रमांकावर पोहोचले आहे. क्र मांक घसरल्याने महापौरांसह अधिकाºयांची कोंडी झाली.

Cleanliness bills; | स्वच्छतेची बोंब;बिल मात्र अव्वाच्या सव्वा

स्वच्छतेची बोंब;बिल मात्र अव्वाच्या सव्वा

Next
ठळक मुद्देसहा महिन्यात ३४.३३ कोटींचे बिल : कंपनीने केली ७.३३ कोटींची वाढ

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : स्वच्छतेच्या बाबतीत नागपूर शहर २० व्या क्र मांकावरून १३७ व्या क्रमांकावर पोहोचले आहे. क्र मांक घसरल्याने महापौरांसह अधिकाºयांची कोंडी झाली. असे असतानाही शहरातील कचरा संकलन करण्याची जबाबदारी असलेल्या कनक रिसोर्सेस मॅनेजमेंट लिमिटेडचे घर भरण्याचा प्रकार सुरूच आहे. कचरा संकलनासाठी कंपनीला २७ कोटींची रक्कम देण्याचे ठरले असताना कंपनीने वित्त वर्षाच्या सुरुवातीच्या सहा महिन्यासाठी ३४ .३३ कोटींचे बिल महापालिकेला दिले आहे. महापालिकेने या रकमेसह वाढीव ७.३३ कोटींची अतिरिक्त रक्कम देण्याची तयारी चालविली आहे. गुरुवारी होणाºया महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत याबाबतचा प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे.
बिलाच्या रकमेत अचानक दुपटीने वाढ झाल्याने शहरात कचरा होण्याचे प्रमाणही दुपटीने वाढले का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. महापालिकेच्या माहितीनुसार शहरातून दररोज ११०० मेट्रिक टन कचरा संकलित के ला जातो. हा कचरा उचलून भांडेवाडी येथे नेण्याचा खर्च कनकला दिला जातो तर त्यावर प्रक्रिया करण्यासाठी वेगळा खर्च केला जातो. सध्या २०० मेट्रिक टन कचºयावर प्रक्रिया केली जाते.कचरामुक्त शहराची संकल्पना डोळ्यापुढे ठेवून महापालिकेने २४ डिसेंबर २००७ रोजी स्थायी समितीने १० वर्षांसाठी कनक रिसोर्सेसला काम दिले होते. १२ जून २०१४ रोजी वर्षाला २७ कोटींच्या आधारावर पाच वर्र्षांसाठी १३५ कोटींच्या खर्चाला मंजुरी देण्यात आली होती. परंतु कचरा संकलनाच्या रकमेत अचानक दुपटीने वाढ करण्यात आल्याने नागरिकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
बिलातील घोळाची चौकशी
कनक रिसोर्सेस मॅनेजमेंटवर कचरा संकलन व दर तसेच बिलात घोळ केल्याचा आरोप आहे. अनेक प्रकरणांची चौकशी सुरू आहे. कचरा संकलनाच्या दरात वाढ करण्यासाठी कंपनीच्या व्यवस्थापनाने महापालिकेतील अधिकाºयांशी संगनमत केल्याचा आरोप आहे. याची चौकशी केली जात आहे. महापालिकेची आर्थिक स्थिती बिकट असल्याने कचरा संकलनाचे वाढीव बिल ही एक मोठी समस्या मानली जात आहे.
कचरागाड्या येत नाही
कचरा संकलनासाठी कनकच्या गाड्या घरोघरी जात असल्याचा दावा केला जातो. प्रत्यक्षात कंपनीकडे १००४ वाहने आहेत. शहरातील मध्य भागात कचरा घराघरातून संकलित केला जातो. इतर भागातील परिस्थिती वेगळी आहे. अनेक वस्त्यात दिवसभर कचरा रस्त्यांवर पडून असतो. परंतु कपंनी कचरा उचलत नाही, अशी नागरिकांची तक्रार आहे.

Web Title: Cleanliness bills;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.