स्वच्छ सर्वेक्षणात नागपूरची रँकिंग सुधारली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2018 12:31 AM2018-06-24T00:31:42+5:302018-06-24T00:33:11+5:30

केंद्र सरकारच्या गृहनिर्माण व शहर विकास मंत्रालयातर्फे देशभरात करण्यात आलेल्या स्वच्छ सर्वेक्षणात नागपूरला ५५ वे स्थान मिळाले आहे. परंतु गेल्या वर्षीच्या तुलनेत नागपूरची रँकिंग नक्कीच सुधारली आहे. या सर्वेक्षणात स्वच्छतेबाबतचे जे निकष ठेवण्यात आले होते, त्यात नागपूरला ४००० पैकी २८३४.९५ गुण मिळाले आहे. तर स्वच्छ सर्वेक्षणात पहिल्या क्रमांकावर आलेल्या इंदूर शहराला ३७०७ गुण मिळाले आहे. नागपूरच्या गुणांच्या घसरणीसाठी ‘सर्व्हिस लेव्हल प्रोग्रेस’ कारणीभूत ठरले आहे.

In the clean survey, Nagpur's ranking improved | स्वच्छ सर्वेक्षणात नागपूरची रँकिंग सुधारली

स्वच्छ सर्वेक्षणात नागपूरची रँकिंग सुधारली

googlenewsNext
ठळक मुद्देदेशात ५५ व्या तर राज्यात दहाव्या स्थानी : ‘सर्व्हिस लेव्हल प्रोग्रेस’वर घसरले गुण

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : केंद्र सरकारच्या गृहनिर्माण व शहर विकास मंत्रालयातर्फे देशभरात करण्यात आलेल्या स्वच्छ सर्वेक्षणात नागपूरला ५५ वे स्थान मिळाले आहे. परंतु गेल्या वर्षीच्या तुलनेत नागपूरची रँकिंग नक्कीच सुधारली आहे. या सर्वेक्षणात स्वच्छतेबाबतचे जे निकष ठेवण्यात आले होते, त्यात नागपूरला ४००० पैकी २८३४.९५ गुण मिळाले आहे. तर स्वच्छ सर्वेक्षणात पहिल्या क्रमांकावर आलेल्या इंदूर शहराला ३७०७ गुण मिळाले आहे. नागपूरच्या गुणांच्या घसरणीसाठी ‘सर्व्हिस लेव्हल प्रोग्रेस’ कारणीभूत ठरले आहे.
गेल्या वर्षी या सर्वेक्षणात ४३४ शहरांचा समावेश करण्यात आला होता. त्यात नागपूर १३५ व्या क्रमांकावर होते. परंतु यावर्षी सर्वेक्षणात शहरांची संख्या वाढली असतानाही नागपूर ५५ व्या स्थानी आले आहे. विशेष म्हणजे, महाराष्ट्रातून या सर्वेक्षणात २० शहरांचा समावेश करण्यात आला होता. राज्यात नवी मुंबई हे पहिल्या क्रमांकावर राहिले आहे; तर वर्धा नवव्या स्थानी असून, नागपूरचा क्रमांक दहावा आहे.
या सर्वेक्षणात तीन महत्त्वाच्या बाबींवर गुण देण्यात आले. यात सर्व्हिस लेव्हल प्रोग्रेस, डायरेक्ट आॅब्झर्व्हेशन व सिटीजन फिडबॅक. सर्व्हिस लेव्हल प्रोग्रेससाठी १४०० गुण होते, यात नागपूरला ६३९, डायरेक्ट आॅब्झर्व्हेशन यासाठी १२०० गुण होते, यापैकी ११६४.५२ व सिटीजन फिडबॅक १४०० यापैकी १०३१.४३ गुण मिळाले आहे.
सर्वेक्षणात घनकचऱ्याचा संग्रह व ट्रान्सपोर्टेशन यावर ३० टक्के, प्रक्रिया व व्यवस्थापनावर २५ टक्के, शौचालयाच्या वापरावर ३० टक्के, माहिती-शिक्षण व संवाद यावर ५ टक्के, कॅपॅसिटी बिल्डिंग यावर ५ टक्के व नवीन इनोव्हेशन यावर ५ टक्के अशी गुणांची टक्केवारी होती.
कचरा प्रक्रिया व व्यवस्थापनात नागपूर पिछाडले
शहरात कचऱ्याचे संकलन कनक रिसोर्सेसच्या माध्यमातून करण्यात येते. शहरात संग्रहित होणारा सर्व कचरा हा भांडेवाडीत साठविण्यात येतो. भांडेवाडीतील कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात येणारा प्लांट बंद पडला असल्याने कचरा निव्वळ साठविण्यात येत आहे. भांडेवाडीत कचऱ्याचे ढिगारे लागले आहे. त्यामुळे महापालिकेचे कचरा व्यवस्थापन बिघडले आहे. याचा परिणाम गुणांकनावर झाला व नागपूर पिछाडले.

बेस्ट इनोव्हेशन सिटी नागपूर
स्वच्छ सर्वेक्षणात नागपूर ५५ व्या स्थानी असले तरी, बेस्ट इनोव्हेशन आणि त्याचे संचालन करण्यासाठी १० लाखावर लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये नागपूरला बेस्ट इनोव्हेशन अ‍ॅण्ड बेस्ट प्रॅक्टिसेस सिटीचा अवॉर्ड मिळाला आहे. यात कचरा व्यवस्थापनासाठी हिरव्या आणि निळ्या बास्केट, स्मार्ट वॉच आदींचा समावेश आहे.

घनकचरा व्यवस्थापनावर फोकस आवश्यक
 गेल्या वर्षीच्या तुलनेत नागपूरची रँकिंग सुधारली आहे. सर्वेक्षणात शहर वाढले असताना नागपूर ५५ व्या स्थानी आले आहे. घनकचरा व्यवस्थापनावर महापालिकेला लक्ष देणे गरजेचे आहे, सोबतच नागरिकांनासुद्धा या अभियानात जोडावे लागणार आहे. नागपूरची रॅँकिंग सुधारण्यात महापालिकेचे तत्कालीन आयुक्त अश्विन मुदगल, सध्याचे आयुक्त वीरेंद्र सिंग, महापौर नंदा जिचकार व त्यांच्या टीमचा मोठा वाटा आहे.
कौस्तुभ चॅटर्जी, पर्यावरण तज्ज्ञ

Web Title: In the clean survey, Nagpur's ranking improved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :nagpurनागपूर