नागपुरात डॉक्टरविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2018 01:07 AM2018-05-30T01:07:50+5:302018-05-30T01:08:09+5:30

मेडिकलची अ‍ॅडमिशन करून देतो, अशी थाप मारून एका व्यक्तीकडून एक लाख रुपये हडपणाऱ्या डॉ. सुनील मनोहर देव (वय ५८) यांच्याविरुद्ध अंबाझरी पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.

Cheating against a doctor in Nagpur | नागपुरात डॉक्टरविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

नागपुरात डॉक्टरविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

googlenewsNext
ठळक मुद्देमेडिकलला अ‍ॅडमिशन करून देण्याची थाप : एक लाख रुपये हडपले

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मेडिकलची अ‍ॅडमिशन करून देतो, अशी थाप मारून एका व्यक्तीकडून एक लाख रुपये हडपणाऱ्या डॉ. सुनील मनोहर देव (वय ५८) यांच्याविरुद्ध अंबाझरी पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
डॉ. देव न्यू मनीषनगर, सोमलवाड्यातील प्रिया अपार्टमेंटमध्ये राहतात. ते लता मंगेशकर हॉस्पिटलमध्ये नोकरी करतात. या हॉस्पिटलच्या मॅनेजमेंट कमिटीसोबत आपले चांगले संबंध असल्याचे त्यांनी रवींद्र वसंतराव मुदलियार (वय ६२, रा. चंद्रमोहन वैष्णव अपार्टमेंट, वर्मा ले-आऊट अंबाझरी) यांना २०११ मध्ये सांगितले होते. मुदलियार यांच्या वंदना नामक मुलीची डॉक्टर बनण्याची इच्छा असून तशी तयारीही वंदनाने चालविली आहे. तिला मेडिकलमध्ये अ‍ॅडमिशन मिळावी म्हणून रवींद्र मुदलियार प्रयत्नरत आहेत. त्यांनी डॉ. सुनील देव यांना भेटून तसे बोलून दाखवले. देव यांनी त्यांना वंदनाची अ‍ॅडमिशन लता मंगेशकरमध्ये करून देतो, असे आमिष दाखवले. त्या बदल्यात मुदलियार यांच्याकडून एक लाख रुपये घेतले. मात्र बरेच दिवस होऊनही अ‍ॅडमिशन करून दिली नाही. घेतलेले एक लाख रुपयेही परत केले नाही. त्यामुळे त्यांनी अंबाझरी पोलिसांकडे तक्रार नोंदवली. पोलिसांनी सोमवारी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. डॉ. देव यांची चौकशी केली जात आहे.

Web Title: Cheating against a doctor in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.