नागपुरातील तरुणीच्या हत्येचे प्रकरण : धावत्या दुचाकीवरून मयुरीला ओढण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2018 12:55 AM2018-10-02T00:55:23+5:302018-10-02T00:56:12+5:30

दुचाकीला जोरदार धडक मारून तरुणीची हत्या करणाऱ्या आरोपींनी हत्येपूर्वी तिला धावत्या दुचाकीवरून ओढण्याचा प्रयत्न केला होता. कसाबसा बचाव करीत आरोपींच्या हातून निसटत तरुणीच्या मित्राने तिला घराकडे नेण्याचा प्रयत्न केला. ते निसटून जाऊ शकतात, हे ध्यानात आल्याने आरोपींनी दुचाकीला जोरदार धडक मारून मयुरी तरुण हिंगणेकर (वय २५) हिची हत्या केली आणि तिचा मित्र अक्षय किशोर नागरगणे याला गंभीर जखमी केल्याची माहिती पुढे आली आहे.

Case of murder of girl: Trying to pull Mayuri on running bicycle | नागपुरातील तरुणीच्या हत्येचे प्रकरण : धावत्या दुचाकीवरून मयुरीला ओढण्याचा प्रयत्न

नागपुरातील तरुणीच्या हत्येचे प्रकरण : धावत्या दुचाकीवरून मयुरीला ओढण्याचा प्रयत्न

Next
ठळक मुद्देहत्येचा कट आधीच रचल्याचा संशय : फरार आरोपी गजाआड

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दुचाकीला जोरदार धडक मारून तरुणीची हत्या करणाऱ्या आरोपींनी हत्येपूर्वी तिला धावत्या दुचाकीवरून ओढण्याचा प्रयत्न केला होता. कसाबसा बचाव करीत आरोपींच्या हातून निसटत तरुणीच्या मित्राने तिला घराकडे नेण्याचा प्रयत्न केला. ते निसटून जाऊ शकतात, हे ध्यानात आल्याने आरोपींनी दुचाकीला जोरदार धडक मारून मयुरी तरुण हिंगणेकर (वय २५) हिची हत्या केली आणि तिचा मित्र अक्षय किशोर नागरगणे याला गंभीर जखमी केल्याची माहिती पुढे आली आहे. दरम्यान, या थरारक हत्याकांडात फरार असलेले आरोपी आशिष कृष्णराव साळवे, दीपक तुळशीराम भुडे आणि मोहित मनोहर साळवे या तिघांनाही अटक करण्यात अखेर गणेशपेठ पोलिसांनी यश मिळवले. त्यांना न्यायालयात हजर करून, त्यांची ५ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी मिळवण्यात आली. मुख्य आरोपी अनिकेत कृष्णाजी साळवे (वय २३, रा. छोटा लोहारपुरा, गणेशपेठ) याला रविवारी सकाळीच पोलिसांनी अटक केली होती.
एकतर्फी प्रेमातून रविवारी पहाटे गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही थरारक घटना घडली होती. वडिलांचे छत्र हरविलेली मयुरी हिंगणेकर तिचा मित्र अक्षय नागरगणे याच्यासोबत शनिवारी मध्यरात्री कोराडीकडून दुचाकीने येत असताना मीठा नीम दर्ग्याजवळ आरोपी अनिकेत साळवे, त्याचा भाऊ आशिष, चुलत भाऊ मोहित साळवे आणि दीपक भुडे या चौघांनी तिला अडवले. तेथून ते कसेबसे सटकले असता, सीताबर्डीतील एका मॉलजवळ अडवून त्यांना शिवीगाळ करून मारहाण करण्याचा प्रयत्न केला. प्रसंगावधान राखत मयुरीला दुचाकीवर बसवून अक्षय सुसाट वेगाने घराकडे निघाला. आरोपीही त्यांच्या कारमध्ये बसून वेगाने पाठलाग करू लागले. कॉटन मार्केट ते गांधीसागर तलावाजवळच्या मार्गावर आरोपींनी मयुरीला धावत्या दुचाकीवरून ओढण्याचा अनेकदा प्रयत्न केला. तिला तसेच फरफटत नेण्याचे आरोपींचे मनसुबे होते. त्यासाठी पाठलाग करताना आरोपी कारच्या दाराच्या खिडकीतून तिचे केस पकडण्याचा प्रयत्न करीत होते. एकदा तिचे केस आरोपींच्या हाती लागले. मात्र, ते कसेबसे सोडवून घेत मयुरी आणि अक्षय घराकडे जाऊ लागले.
काही अंतरावरच पोलीस ठाणे आणि मयुरीचे घर असल्याने ती आपल्या हातून निसटून जाऊ शकते, हे ध्यानात आल्याने आरोपींनी मयुरीला फरफटत नेण्याचा प्रयत्न सोडला. त्यांनी कारचा वेग वाढवून अक्षयच्या दुचाकीला जोरदार धडक मारली. परिणामी डोक्याच्या भारावर आदळून मयुरी जागीच गतप्राण झाली तर अक्षय गंभीर जखमी झाला. शनिवारी मध्यरात्रीनंतर १ ते १.३० च्या सुमारास आरोपींनी हे हत्याकांड केले. एवढ्या रात्री रस्त्यावर कुणी नसणार, आपण पळून जाऊ, पोलीस अपघाताची नोंद करतील, असे आरोपींना वाटत होते. मात्र, अपघातस्थळापासून काही अंतरावरच मोठ्या संख्येत मंडळी होती. एक पत्रकारही आपले कर्तव्य आटोपून घराकडे जात होते. एवढेच नव्हे तर मयुरीची हत्या करण्याच्या प्रयत्नात तिचा पाठलाग करणाºया आरोपीने एका दुचाकीचालकालाही कट मारला होता. तो देखील आरोपींच्या कारमागे होता. धडक मारल्याचा आवाज ऐकून बाजूची मंडळी धावली आणि त्यांनी आरोपींना पकडले. त्यामुळे हत्येला अपघाताचे स्वरूप देण्याचा आरोपींचा कट उधळल्या गेला.

पोलिसांनी केली होती अपघाताची नोंद
गणेशपेठ पोलिसांनी जमावाच्या हातून आरोपींना ताब्यात घेऊन ठाण्यात आणले. त्यावेळेपर्यंत तो अपघाताच आहे, असे पोलीस समजत होते. त्यामुळे की काय, पोलिसांनी आरोपी अनिकेत साळवे वगळता अन्य आरोपींकडे दुर्लक्ष केले. ते ठाण्यातून पळून गेल्याचे समजते तर पोलिसांनी हत्येऐवजी अपघाताचा गुन्हा दाखल केला होता. मात्र, मृत मयुरीची आई पुष्पा हिंगणेकर यांनी मयुरीची हत्या झाल्याची तक्रार नोंदवली. जखमी अक्षयनेही तसेच बयान नोंदविले. त्यामुळे पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून अनिकेतसह पळून गेलेल्या अन्य तीन आरोपींनाही अटक केली.

मृत्यूपूर्वी केला मयुरीने शुभमला फोन
आपला जीव घेतला जाणार, याची कल्पना आल्याने मयुरीने मृत्यूपूर्वी तिचा जुना मित्र शुभम साळवे याला धावत्या दुचाकीवरून फोन केला होता. तुझे नातेवाईक मित्र माझी हत्या करण्याच्या इराद्याने पाठलाग करीत आहेत, असे तिने शुभमला सांगितले होते. मदतीची याचनाही केली होती, मात्र त्याने दाद दिली नाही. या हत्याकांडात त्याची भूमिका काय आहे, ते पोलीस तपासत आहेत.

Web Title: Case of murder of girl: Trying to pull Mayuri on running bicycle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.