कारची काच फोडून साडेतीन लाख लंपास

By admin | Published: August 7, 2015 02:45 AM2015-08-07T02:45:46+5:302015-08-07T02:45:46+5:30

कारची काच तोडून लुटारूने साडेतीन लाखांची रोकड लंपास केली. लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत सेंट्रल एव्हेन्यूवरील हनी पॅलेस अपार्टमेंटसमोर...

Car glass breaks three and a half lakh lamps | कारची काच फोडून साडेतीन लाख लंपास

कारची काच फोडून साडेतीन लाख लंपास

Next

सेंट्रल एव्हेन्यूवरील घटना : व्यापाऱ्याला फटका
नागपूर : कारची काच तोडून लुटारूने साडेतीन लाखांची रोकड लंपास केली. लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत सेंट्रल एव्हेन्यूवरील हनी पॅलेस अपार्टमेंटसमोर आज सकाळी ११ ला ही खळबळजनक घटना घडली.
रूपेश अग्रवाल हे लाकूड व्यापारी असून, त्यांची पाचपावलीतील लष्करीबागेत आरामशीन आहे. भांडेवाडी रेल्वे स्थानकाजवळ राहणारे पुरुषोत्तम हरिदास पडोळे (वय ४६) हे त्यांच्याकडे वाहनचालक म्हणून कार्यरत आहेत.
आज सकाळी अग्रवाल यांनी पडोळे यांना कामावर येताच एक साडेतीन लाखांचा धनादेश दिला. वैष्णोदेवी चौकातील इंडियन बँकेतून धनादेश वटवून ही रक्कम तसेच तिकडून येताना घरून टिफीनसुद्धा आणा, असे सांगितले. त्यानुसार बँकेतून साडेतीन लाखांची रक्कम काढल्यानंतर पडोळे यांनी ती रक्कम एका पिशवीत ठेवली. ही पिशवी झायलो कारमध्ये (एमएच ३१/ डीसी १४९९) ठेवल्यानंतर ते हनी अपार्टमेंटमध्ये आले. कार अपार्टमेंटच्या पार्किंग गेटसमोर उभी करून ते अग्रवाल यांचा टिफीन घेण्यासाठी सदनिकेत गेले. ७ ते १० मिनिटातच ते परत आले. तेवढ्या वेळेत एका लुटारूने झायलोच्या दाराची काच फोडली आणि साडेतीन लाखांची रोकड असलेली पिशवी चोरून नेली. या प्रकरणाची माहिती पडोळे यांनी अग्रवाल आणि त्यानंतर लकडगंज ठाण्यात दिली. त्यानुसार एपीआय राजुलवार आपल्या ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आजूबाजूच्यांना विचारणा केली. तेव्हा एक व्यक्ती दुचाकीने आला होता, एवढीच माहिती बाजूच्यांनी सांगितली.

Web Title: Car glass breaks three and a half lakh lamps

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.