भाजप सरकारने केवळ भूमिपुजनच केले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2019 11:12 PM2019-02-26T23:12:16+5:302019-02-26T23:13:32+5:30

विदर्भातील बोटावर मोजण्या इतके विधानसभा क्षेत्र सोडल्यास इतर क्षेत्रातील नागरिकांमध्ये असंतोष पसरला आहे. गेल्या पाच वर्षात विदर्भात एकही उद्योग लागलेला नाही. बेरोजगारी कमी झाली नाही. मेळघाटातील कुपोषण संपलेले नाही. सिंचन आणि रस्त्याचा विकास झाला नाही. जे प्रकल्पाची काँग्रेसच्या काळात घोषणा झाली होती. त्याच प्रकल्पाचे भूमिपुजन भाजपा सरकार करीत आहे. भाजपा सरकारने आपल्या पाच वर्षाच्या कार्यकाळात केवळ भूमिपुजनच केले असल्याचा आरोप महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी पत्रपरिषेदत केला.

The BJP government has done only Bhoomipujan | भाजप सरकारने केवळ भूमिपुजनच केले

भाजप सरकारने केवळ भूमिपुजनच केले

Next
ठळक मुद्देमहाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या अध्यक्षांचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विदर्भातील बोटावर मोजण्या इतके विधानसभा क्षेत्र सोडल्यास इतर क्षेत्रातील नागरिकांमध्ये असंतोष पसरला आहे. गेल्या पाच वर्षात विदर्भात एकही उद्योग लागलेला नाही. बेरोजगारी कमी झाली नाही. मेळघाटातील कुपोषण संपलेले नाही. सिंचन आणि रस्त्याचा विकास झाला नाही. जे प्रकल्पाची काँग्रेसच्या काळात घोषणा झाली होती. त्याच प्रकल्पाचे भूमिपुजन भाजपा सरकार करीत आहे. भाजपा सरकारने आपल्या पाच वर्षाच्या कार्यकाळात केवळ भूमिपुजनच केले असल्याचा आरोप महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी पत्रपरिषेदत केला.
तांबे म्हणाले की, राष्ट्रीय महामार्ग सोडल्यास गावांना जोडणाऱ्या रस्त्याची दुरावस्था आजही कायम आहे. प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेत शेतकऱ्यांना ६ हजार रुपये वर्षाची मदत दिली जाणार आहे. यवतमाळच्या दौऱ्यात लक्षात आले की, तिथे ५ लाख २० हजार शेतकऱ्यांना मदतीची आवश्यकता आहे. परंतु प्रशासनाकडून केवळ २ लाख शेतकऱ्यांची मदतीसाठी निवड करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत यवतमाळ जिल्ह्याच्या आत्महत्या थांबणे शक्य नाही. तांबे म्हणाले की, केंद्र व राज्य सरकारची पोलखोल करण्यासाठी काँग्रेसने शहरात ‘चलो वार्ड की और’ व ग्रामीण भागात ‘चलो गाव की और’ हे अभियान राबवित आहे. पत्रपरिषदेला प्रदेश पदाधिकारी सागर देशमुख, शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष तौसिफ खान, अनुराग भोयर आदी उपस्थित होते.
 पाच सूत्री कार्यक्रम राबविणार
तांबे म्हणाले की अभियानांतर्गत बेरोजगार युवकांना शक्तीकार्ड व शेतकऱ्यांना किसान शक्ती कार्ड बनवून देण्यात येईल. काँग्रेस सरकारमध्ये आल्यावर बेरोजगारांना रोजगार भत्ता देणे व रोजगार नोंदणी विभागाला सक्षम करण्यात येईल. शेतकऱ्यांसाठी संपुर्ण कर्जमाफी योजना राबविण्यात येईल. अभियानात राफेल खरीदीतील भ्रष्टाचार जनतेला सांगण्यात येईल. आचारसंहिता लागल्यानंतरही युवा कार्यकर्ता डोअर-टू-डोअर अभियान राबवतील.

Web Title: The BJP government has done only Bhoomipujan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.