नागपुरात बँकेच्या कर्मचाऱ्यांनीच केला अपहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2018 02:21 PM2018-08-28T14:21:45+5:302018-08-28T14:23:53+5:30

कर्जधारकांकडून वसूल केलेली रक्कम बँकेत जमा न करता त्या रकमेचा बँकेच्या कर्मचाऱ्यांनी स्वत:च वापर केला. मानकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका बँकेत हा गैरप्रकार घडला.

Bank staff in Nagpur did the fraud | नागपुरात बँकेच्या कर्मचाऱ्यांनीच केला अपहार

नागपुरात बँकेच्या कर्मचाऱ्यांनीच केला अपहार

googlenewsNext
ठळक मुद्देकर्जदारांकडून रक्कम वसूलस्वत:च केली खर्चमानकापुरात गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कर्जधारकांकडून वसूल केलेली रक्कम बँकेत जमा न करता त्या रकमेचा बँकेच्या कर्मचाऱ्यांनी स्वत:च वापर केला. मानकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका बँकेत हा गैरप्रकार घडला. तो लक्षात आल्यानंतर दोन कर्मचाऱ्यांविरुद्ध मानकापूर पोलिसांनी सोमवारी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
कोराडी मार्गावर एक खासगी बँक आहे. या बँकेचे व्यवस्थापक रोहित ओमप्रकाश सोनी (वय ३३) यांनी मानकापूर पोलिसांकडे नोंदविलेल्या तक्रारीनुसार, आरोपी मनीष विठ्ठलराव बघेल (वय ३३) हा धनगवळीनगर, पिपळा रोड (राजापेठ) ला राहतो. तो बँकेने दिलेल्या कर्जदारांकडील सुलभ हप्ते (किस्त) गोळा करण्याचे काम करीत होता. त्याने ८ सप्टेंबर २०१६ ते आॅगस्ट २०१७ या कालावधीत कर्जदाराकडून १०,१९० रुपयांची रक्कम वसूल केली. मात्र, ही रक्कम बँकेत जमा न करता स्वत:च वापरली.
अशाच प्रकारे राममोहन बैरंगी राव (वय २६, रा. गितानगर, झिंगाबाई टाकळी) याने ९ सप्टेंबर २०१६ ते १४ आॅगस्ट २०१७ या कालावधीत कर्जदारांकडून ६७,७८१ रुपये गोळा केले. मात्र ते बँकेत जमा न करता त्या रकमेचा अपहार केला. ही अफरातफर लक्षात आल्यानंतर बँकेतर्फे रोहित सोनी यांनी मानकापूर ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी चौकशी करून सोमवारी बँकेचे दोषी कर्मचारी बघेल आणि राव या दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदविला.

तक्रारीस विलंब का ?
या फसवणूक प्रकरणातील रक्कम फार मोठी नाही. बँकेचा एकूणच व्याप लक्षात घेता अफरातफरीचा प्रकार जास्त वेळ दडून राहू शकत नाही. एजंटस्नी रक्कम हडपल्याची बाब आधीच उघड होऊनही गुन्हा दाखल करण्यास एवढा विलंब का झाला, ते कळायला मार्ग नाही.

Web Title: Bank staff in Nagpur did the fraud

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Crimeगुन्हा