नागपूर जिल्ह्यातील ३४ शाळांचा पट ५ पेक्षाही कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2019 10:40 AM2019-05-13T10:40:57+5:302019-05-13T10:43:02+5:30

खेडोपाडी ज्ञानगंगा पोहचविण्याचे कार्य शासनाने स्थानिक स्वराज संस्थेच्या शाळा उभारून केले. पण काळाच्या ओघात सरकारी शाळांचे अस्तित्व झपाट्याने कमी होत चालले आहे.

Attendance of students is less than 5 in Nagpur district | नागपूर जिल्ह्यातील ३४ शाळांचा पट ५ पेक्षाही कमी

नागपूर जिल्ह्यातील ३४ शाळांचा पट ५ पेक्षाही कमी

Next
ठळक मुद्देजिल्हा परिषदेच्या शाळांची अवस्था शिक्षण व्यवस्थेपुढे प्रश्नचिन्ह

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : खेडोपाडी ज्ञानगंगा पोहचविण्याचे कार्य शासनाने स्थानिक स्वराज संस्थेच्या शाळा उभारून केले. पण काळाच्या ओघात सरकारी शाळांचे अस्तित्व झपाट्याने कमी होत चालले आहे. गेल्या शैक्षणिक सत्रात जि.प.च्या शाळांची पटसंख्या घसरल्याने २४ शाळा बंद करून विद्यार्थ्यांचे इतरत्र समायोजन केले होते. यंदाही मोठी गाज जि.प. शाळांवर पडण्याची शक्यता आहे. कारण ३४ शाळांचा पट हा ५ पेक्षाही कमी असून, भिवापूरच्या एका शाळेत तर विद्यार्थ्यांची पटसंख्या १ आहे. दिवसेंदिवस घसरत चाललेल्या पटसंख्येमुळे शिक्षण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
जि.प. च्या शाळांची पटसंख्या वाढावी यासाठी शासनस्तरावरून विविध प्रयत्न केले जात आहे. विद्यार्थ्यांना गणवेश, पाठ्यपुस्तक, मध्यान्ह भोजन पुरविण्यात येत आहे. त्याचबरोबर शाळांचे डिजिटलायझेशन, शाळांची रंगरंगोटीच्या माध्यमातून शाळांकडे विद्यार्थ्यांचा कल वाढविण्याचा प्रयत्न केला जात आहे. असे असतानाही जि.प.च्या शाळांचा पट दिवसेंदिवस घसरत आहे आणि शाळांना घरघर लागली आहे. गेल्यावर्षी २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या २४ शाळा बंद करून, विद्यार्थ्यांचे समायोजन करण्यात आले होते. यंदा तर २० पेक्षा कमी असलेल्या पटसंख्येच्या शाळांची यादी मोठी आहे. जिल्ह्यात जि.प.च्या १५३८ वर शाळा असून येथे ४३०० वर शिक्षक कार्यरत आहेत. यापैकी जवळपास एक हजारावर शाळा डिजिटल आहेत. मात्र ग्रामीण भागात इंग्रजी शाळांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. त्यामुळे जि.प. शाळांना विद्यार्थी मिळणे कठीण झालेले आहे. त्यामुळे २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा एकतर बंद करण्याचा किंवा त्या लगतच्या शाळांमध्ये समायोजित करण्याच्या हालचाली सुरू आहेत.

Web Title: Attendance of students is less than 5 in Nagpur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.