नागपुरात युपीतील चोरट्यांची बेदम धुलाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2019 11:23 PM2019-02-22T23:23:11+5:302019-02-22T23:24:34+5:30

गुरुवारी दुपारी बंद दाराचे कुलूप तोडून चोरीच्या प्रयत्नात असलेल्या उत्तर प्रदेशातील दोन भामट्यांना पकडून संतप्त जमावाने बेदम चोप दिला. त्यानंतर त्यांना बेलतरोडी पोलिसांच्या हवाली करण्यात आले.

Assaulted of the thieves in UP in Nagpur | नागपुरात युपीतील चोरट्यांची बेदम धुलाई

नागपुरात युपीतील चोरट्यांची बेदम धुलाई

Next
ठळक मुद्देजमावाने रंगेहात पकडले : बेलतरोडी पोलिसांनी केली अटक

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गुरुवारी दुपारी बंद दाराचे कुलूप तोडून चोरीच्या प्रयत्नात असलेल्या उत्तर प्रदेशातील दोन भामट्यांना पकडून संतप्त जमावाने बेदम चोप दिला. त्यानंतर त्यांना बेलतरोडी पोलिसांच्या हवाली करण्यात आले. भोलानाथ मिश्रीलाल जयस्वाल (वय ३५, रा. लोकापूर बाजार, काली मंदिराजवळ प्रतापगड) आणि कयूम अब्दुल सत्तार खान (वय ५०, रा. मनेहू, ता. सदर, जि. प्रतापगड) अशी आरोपींची नावे आहेत.
नरेंद्रनगरातील भूवी अपार्टमेंटमध्ये दुसऱ्या माळ्यावर राहणारे पिलनकर बाहेरगावी गेले आहेत. गुरुवारी दुपारी २.३० च्या सुमारास पिलनकर यांच्या २०३ क्रमांकाच्या सदनिकेच्या दाराचे कुलूप तोडून जयस्वाल आणि अब्दुल आतमध्ये शिरण्याच्या तयारीत होते. चौथ्या माळ्यावर राहणाऱ्याआरती उदय जोशी (वय ३७) यांनी चोरट्यांना बघितले. प्रसंगावधान राखत त्यांनी आरडाओरड केली. त्यामुळे शेजारी धावले. ते पाहून चोरटे पळू लागले. मात्र, शेजाऱ्यांनी पाठलाग करून त्यांना पकडले आणि त्यांची बेदम धुलाई केली. त्यानंतर त्यांना बेलतरोडी पोलिसांच्या हवाली करण्यात आले. पोलिसांनी जयस्वाल आणि अब्दुलला अटक केली असून, त्यांनी यापूर्वी कोणते गुन्हे केले, त्याची चौकशी केली जात आहे.

Web Title: Assaulted of the thieves in UP in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.