गुन्हेगारांची नांगी ठेचण्यासाठी नागपुरात पाेलिसांचे 'ऑलआऊट' अभियान 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 01:07 PM2021-02-10T13:07:12+5:302021-02-10T13:07:32+5:30

Nagpur news नागपूर शहरातील गुन्हेगारांची नांगी ठेचण्यासाठी पाेलिसांनी साेमवारी रात्री शहरात ऑपरेशन ऑलआऊट अभियान चालविले. या अभियानाअंतर्गत पाेलिसांनी ००० आराेपींना अटक करून प्रतिबंधात्मक कारावाई केली. या कारवाईमुळे गुन्हेगारांमध्ये खळबळ उडाली आहे.

' 'All Out' campaign in Nagpur by Police to crack down on criminals | गुन्हेगारांची नांगी ठेचण्यासाठी नागपुरात पाेलिसांचे 'ऑलआऊट' अभियान 

गुन्हेगारांची नांगी ठेचण्यासाठी नागपुरात पाेलिसांचे 'ऑलआऊट' अभियान 

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : शहरातील गुन्हेगारांची नांगी ठेचण्यासाठी पाेलिसांनी साेमवारी रात्री शहरात ऑपरेशन ऑलआऊट अभियान चालविले. या अभियानाअंतर्गत पाेलिसांनी ००० आराेपींना अटक करून प्रतिबंधात्मक कारावाई केली. या कारवाईमुळे गुन्हेगारांमध्ये खळबळ उडाली आहे.

पाेलिसांच्या हलगर्जीपणामुळे शांतीनगर भागात विजय वागधरे नामक गुन्हेगाराची हत्या झाल्याने पाेलीस आयुक्त अमितेश कुमार नाराज झाल्याचे सांगितले जात आहे. त्यांनी साेमवारी सकाळी दाेन तासपर्यंत शांतीनगर पाेलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचाऱ्यांना चांगलेच झापले. त्यांनी रात्री वरिष्ठ अधिकाऱ्यांना अपराध्यांवर कारवाई करण्यासाठी ऑपरेशन चालविण्याचे निर्देश दिले. त्यानुसार रात्री शहरात ऑपरेशन ऑलआऊट चालविण्यात आले. आयुक्तांच्या निर्देशानंतर सर्व वरिष्ठ अधिकारी रस्त्यावर उतरले. सर्व स्टेशनमध्ये गुन्हेगारांची तत्काळ धरपकड करण्याचे निर्देश देण्यात आले. पाेलिसांनी हत्या आणि इतर गंभीर गुन्ह्यामध्ये लिप्त असलेल्या आराेपींची शाेधमाेहीम सुरू केली. यामध्ये जुने आणि नुकतेच अपराध जगतात आलेल्या गुन्हेगारांचा समावेश आहे. मंगळवारी सकाळपर्यंत चाललेल्या या अभियानात ००० गुन्हेगारांना पकडण्यात आले.

या अभियानामुळे शहरातील काही पाेलीस स्टेशनचे कारागृह हाऊसफूल झाल्याचे सांगण्यात येत आहे. काेराेना प्रकाेपामुळे पाेलिसांनाही भीती आहे. अनेक आराेपी मास्क घातलेही नव्हते. त्यांच्यासाठी मास्क उपलब्ध करण्यात आले. सर्वाधिक १२० आराेपी झाेन ५ अंतर्गत येणाऱ्या स्टेशन हद्दीतून पकडण्यात आले. अटकेतील आराेपींविराेधात सीआरपीसीच्या धारा १५१ व ११० अंतर्गत कारवाई करण्यात आली. शांतीनगरची घटना ध्यानात घेत पाेलीस आयुक्तांनी गुन्हेगारांच्या विराेधात येणाऱ्या तक्रारी गंभीरतेने हाताळण्याचे व आराेपींवर कठाेर कारवाई करण्याचा इशारा दिला. पाेलीस आयुक्तांनी घेतलेल्या भूमिकेमुळे वरिष्ठ अधिकारी व ठाणेदारांचीही भांबेरी उडाली आहे.

Web Title: ' 'All Out' campaign in Nagpur by Police to crack down on criminals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस