लुडो किंगनंतर विद्यार्थ्यांना आता ‘पबजी गेम’चे वेड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2018 01:49 PM2018-12-13T13:49:41+5:302018-12-13T13:50:20+5:30

आॅनलाईन मोबाईल गेमने जिल्ह्यातल्या खापरखेडा येथील तरुणाई आहारी गेली आहे. यातच आता पबजी या आॅनलाईन गेमचे तरुणाईला व्यसनच जडले आहे.

After the Ludo King, students are now crazy about 'Pabzi Games' | लुडो किंगनंतर विद्यार्थ्यांना आता ‘पबजी गेम’चे वेड

लुडो किंगनंतर विद्यार्थ्यांना आता ‘पबजी गेम’चे वेड

Next
ठळक मुद्देआॅनलाईन गेमिंगच्या आहारी नागपूर ग्रामीण भागातील तरुणाई

अरु ण महाजन।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आॅनलाईन मोबाईल गेमने जिल्ह्यातल्या खापरखेडा येथील तरु णाई आहारी गेली आहे. पूर्वी मोबाईलवर आॅनलाईन कॅण्डी क्र श, पोकोमन हा गेम खेळला जायचा. हे गेम आताही खेळले जात असले तरी लुडो किंग हा गेम आल्याने कॅण्डी क्र श, पोकोमनची क्र ेझ कमी झाली. ‘लुडो किंग’ वर जुगार ही खेळला जातो यातच आता पबजी या आॅनलाईन गेमने एन्ट्री केली. तरु णाईला याचे व्यसनच जडले.
पबजी हा गेम खूप भुरळ पाडणार असाच आहे. शाळा, कॉलेजमधील विद्यार्थी, अनेक नोकरदार वर्ग फावल्या वेळात गेम खेळताना दिसत आहेत. काही मुले तर खाणेपिणे विसरून तासन्तास हा गेम खेळत बसतात. झोप विसरून रात्री उशिरापर्यंत हा गेम खेळला जात असल्याचे दिसून आले आहे.
हल्ली मोबाईल डेटा अतिशय स्वस्तात उपलब्ध असल्याने गल्लोगल्ली मोबाईल आडवा धरून कानात हेडफोन घालून मुले, मुली आणि काही ज्येष्ठ मंडळीही हा गेम खेळताना दिसतात. परिणामी काही विद्यार्थी परीक्षेच्या कालावधीतही अभ्यासाकडे दुर्लक्ष करून गेम खेळत असल्याने इंजिनिअरिंगच्या द्वितीय वर्षातील कामठी येथील विद्यार्थी नापास झाला.
मुख्य म्हणजे हा गेम खेळता खेळता अनेकजण त्यात इतके गुंग होत आहेत की आजूबाजूला काय घडत आहे, याचा अंदाज त्यांना येत नाही. मुलांची बिघडणारी मानसिकता आणि ढासळत्या आरोग्याला आॅनलाईन गेम कारणीभूत ठरतात. या गेममुळे परिसरातील मुलांचा हट्टीपणा वाढत चालला आहे.आकर्षक व्हिज्युअल्स, मारधाड आणि अ‍ॅक्शनमुळे हा गेम सध्या येथील तरु णाईच्या गळ्यातील ताईत बनला आहे. मुळात हा खेळ १८ वर्षावरील मुलांसाठीच आहे. पण त्यापेक्षा कमी वयाची मुलेही हा गेम जास्त खेळत आहे. या लहान मुलांमध्ये परिसरातील इंग्रजी माध्यमामध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी अधिक आहे. या मारधाडीच्या खेळामुळे मुलांमध्ये आक्र मक स्वभाव वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे यावर अंकुश लावणे गरजेचे आहे. अन्यथा मुलांना लवकरच मानसोपचारतज्ज्ञांकडे उपचारास नेण्याची पाळी येऊ शकते.
या गेममध्ये असलेल्या मारामारीचे अनुकरण खऱ्या आयुष्यातही करण्याची मानसिकता मुलांमध्ये तयार होते. अशी परिस्थिती सध्या खापरखेडा येथे आहे. मारधाडीचे बरेचसे अल्पवयीन आरोपीची नोंद खापरखेडा पोलीस स्टेशनमध्ये आहे, हे विशेष.

Web Title: After the Ludo King, students are now crazy about 'Pabzi Games'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.