खाद्यपदार्थ विकणाऱ्या अनधिकृत विक्रेत्यावर धावत्या रेल्वेत कारवाई - कॅटरिंग ईन्स्पेकटरची कारवाई

By नरेश डोंगरे | Published: May 3, 2024 11:43 PM2024-05-03T23:43:05+5:302024-05-03T23:44:14+5:30

रेल्वे गाड्या अथवा स्थानकावर खाद्य पदार्थ विकण्यासाठी भारतीय रेल्वे कॅटरिंग अँड टूरिझम कॉर्पोरेशन (आयआरसीटीसी)कडून परवानगी घ्यावी लागते. मात्र, विविध रेल्वे गाड्यांमध्ये अनेक जण कोणतीही परवानगी न घेता दर्जाहिन खाद्यपदार्थ विकून प्रवाशांच्या आरोग्याशी, जिविताशी खेळ करीत असतात.

Action against unauthorized vendors selling food in running train Action by Catering Inspector | खाद्यपदार्थ विकणाऱ्या अनधिकृत विक्रेत्यावर धावत्या रेल्वेत कारवाई - कॅटरिंग ईन्स्पेकटरची कारवाई

प्रतिकात्मक फोटो...

नागपूर : परवानगी नसताना रेल्वेगाडीत वेगवेगळे खाद्य पदार्थ विकणाऱ्या ८ जणांना अटक करण्यात आली. महाराष्ट्र एक्सप्रेसमध्ये शुक्रवारी बडनेरा ते नागपूर दरम्यान रेल्वे केटरिंग इन्स्पेक्टरकडून ही कारवाई करण्यात आली.

रेल्वे गाड्या अथवा स्थानकावर खाद्य पदार्थ विकण्यासाठी भारतीय रेल्वे कॅटरिंग अँड टूरिझम कॉर्पोरेशन (आयआरसीटीसी)कडून परवानगी घ्यावी लागते. मात्र, विविध रेल्वे गाड्यांमध्ये अनेक जण कोणतीही परवानगी न घेता दर्जाहिन खाद्यपदार्थ विकून प्रवाशांच्या आरोग्याशी, जिविताशी खेळ करीत असतात. त्यांच्यावर अंकूश लावण्याची जबाबदारी आयआरसीटीसीच्या प्रतिनिधींसह केटरिंग इन्स्पेक्टरची असते. मात्र, त्यांचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने प्रवाशांच्या आरोग्याशी खेळ चालू असतो. असे प्रकार अलिकडे वाढल्याची ओरड उठल्यामुळे शुक्रवारी आयआरसीटीसीचे प्रतिनिधी आणि कॅटरिंग ईन्स्पेक्टरच्या पथकाने बडनेरा येथून महाराष्ट्र एक्सप्रेसमध्ये तपासणी सुरू केली. वेगवेगळ्या डब्यात खाद्यपदार्थ विकणारे ८ जण त्यांच्या हाती लागले. आम्ही आर अॅन्ड के असोसिएटशी संबंधित अधिकृत खाद्य पदार्थ विक्रेते असल्याचे सांगून त्यांनी तपासणी अधिकाऱ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्याकडे कागदपत्रे तपासली असता कोणाच कडे मूळ प्रवासी प्राधिकरण किंवा आयआरसीटीसीने जारी केलेले ओळखपत्र नसल्याचे उघड झाले. त्यानंतर त्यांची कसून विचारपूस केली असता ते अनधिकृत विक्रेते असल्याचे उघड होताच तपासणी पथकाने त्यांना अटक केली. त्यांच्याविरुद्ध रेल्वे कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

ताकिद मिळाल्यानंतर कारवाई
विशेष म्हणजे, गेल्या आठवड्यात बल्लारशाह, नागपूर स्थानकावरून प्रवाशांना दर्जाहिन आणि शिळी अंडा बिर्याणी खाऊ घालण्यात आल्याने ६० ते ७० प्रवाशांना विषबाधा झाली होती. या प्रकरणाने रेल्वे प्रशासनात प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर, रेल्वेचे वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक अमन मित्तल यांनी सर्व खाद्यपदार्थ विक्रेत्या कंत्राटदारांना स्वच्छ, ताजे आणि दर्जेदार खाद्य पदार्थ विकण्याच्या सूचना केल्या आहेत. यात काही कमी जास्त झाल्यास कडक कारवाईचा ईशाराही दिला आहे. त्याचप्रमाणे संबंधित अधिकाऱ्यांना वेळोवेळी तपासण्या करून कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर, ही कारवाई करण्यात आली आहे.
 

Web Title: Action against unauthorized vendors selling food in running train Action by Catering Inspector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.