दिव्यांगांसाठी ५% निधी राखीव- राजकुमार बडोले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2018 04:25 AM2018-12-03T04:25:00+5:302018-12-03T04:25:12+5:30

दिव्यांग व्यक्तीच्या सर्वांगीण विकासाच्या उद्देशाने सामाजिक न्याय आणि विशेष साहाय्य विभागाने नव्याने धोरण आखले आहे.

5% Funds for Divyang reserves, Rajkumar Badoley | दिव्यांगांसाठी ५% निधी राखीव- राजकुमार बडोले

दिव्यांगांसाठी ५% निधी राखीव- राजकुमार बडोले

Next

नागपूर : दिव्यांग व्यक्तीच्या सर्वांगीण विकासाच्या उद्देशाने सामाजिक न्याय आणि विशेष साहाय्य विभागाने नव्याने धोरण आखले आहे. त्यात दिव्यांगांना शिक्षण, त्यांना उत्तम आरोग्य, रोजगार व कौशल्य विकास साधण्यासाठी विविध उपाययोजना केल्या आहेत. विशेष म्हणजे दिव्यांगांसाठी ५ टक्के निधी राखीव ठेवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समाजकल्याण व विशेष साहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी दिली.
दिव्यांगत्वाचे शीघ्र निदान करणे व दिव्यांगत्व रोखण्यासाठी आरोग्य तसेच संबंधित विभागामार्फत विविध उपाययोजना केल्या जातील. त्यात प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये, जिल्हा रुग्णालयात सुविधा उभारण्यात येतील. दिव्यांगावर मात करण्यासाठी शस्त्रक्रिया करणे, हिमोफिलिया आणि थॅलेसिमीया आजाराच्या उपचारासाठी प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र कक्ष उभारले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
शैक्षणिक क्षेत्रातही विशेष प्राधान्य दिले जाणार असून, उच्च शिक्षणाची संधी मिळणार आहे. सर्व शिक्षण अभियानातही त्यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यांच्या गरजा लक्षात घेता शिक्षकांची नियुक्ती करण्यावर भर आहे. शिवाय पाच वर्षांखालील विद्यार्थ्यांसाठी ‘डे केअर मॉडेल’ शाळा उभारण्याला प्राधान्य राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: 5% Funds for Divyang reserves, Rajkumar Badoley

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.