देशात ४४ हजार मुले सिकलसेलग्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2018 11:20 AM2018-05-18T11:20:07+5:302018-05-18T11:20:16+5:30

जगाच्या लोकसंख्येतील २५ टक्के सिकलसेलबाधित रुग्ण एकट्या भारतात आहेत. यात लहान मुलांची संख्या ४४ हजाराच्या घरात आहे.

44 thousand children suffering from sickle cell in India | देशात ४४ हजार मुले सिकलसेलग्रस्त

देशात ४४ हजार मुले सिकलसेलग्रस्त

Next
ठळक मुद्देमेडिकलमधील सिकलसेल सेंटरला मिळणार तांत्रिक मदत

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जगाच्या लोकसंख्येतील २५ टक्के सिकलसेलबाधित रुग्ण एकट्या भारतात आहेत. यात लहान मुलांची संख्या ४४ हजाराच्या घरात आहेत. यामुळे नागपूरच्या मेडिकलमध्ये होणारे ‘द सेंटर आॅफ एक्सलन्स इन सिकलसेल सेंटर’ देशासाठी महत्त्वाचे ठरणार आहे. मेहता फाऊंडेशनच्यावतीने या सेंटरमध्ये तांत्रिक सल्लागार म्हणून काम पाहणार आहे, अशी माहिती नागपूरच्या दौऱ्यावर असलेले डॉ. लक्ष्मणन क्रिष्णमूर्ती यांनी दिली.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) अडीच एकर जागेवर ‘द सेंटर आॅफ एक्सलन्स इन सिकलसेल सेंटर’ होऊ घातले आहे. लवकरच निधीची तरतूद होण्याची शक्यता आहे. मेहता फाऊंडेशनतर्फे दिल्या जाणाऱ्या १२० कोटी रुपयांमधून इंडियन कौन्सिल आॅफ मेडिकल रिसर्चतर्फे (आयसीएमआर) हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पाची माहिती घेण्यासाठी गुरुवारी अमेरिकेतील डॉ. लक्ष्मणन क्रिष्णमूर्ती यांनी गुरुवारी मेडिकलला भेट दिली. डॉ. क्रिष्णमूर्ती हे मेहता फाऊंडेशनसाठी काम करतात. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, हे सेंटर उभारण्यासाठी राज्यशासनाने पुढाकार घेतल्याने लवकरच बांधकामाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. सिकलसेल हा रक्ताशी निगडित आजार आहे. यावर ‘बोनमॅरो’ प्रत्यारोपण हाच एकमेवर उपचार आहे. जेवढ्या कमी वयात, म्हणजे ८ ते १६ या वयोगटात प्रत्यारोपण झाल्यास याचे निकाल चांगले मिळतात. सध्या सिकसेलबाबत जागृकता वाढल्याने अनेक पालक प्रत्यारोपणासाठी पुढे येत आहे. भाऊ किंवा बहिणीचे २५ टक्के ‘बोन मॅरो’ जुळतात. या आजाराला घेऊन नवनवीन तंत्रज्ञानही समोर येत आहे. विशेषत: ‘हाफ मॅच’ हे तंत्रज्ञान महत्त्वाचे ठरणार आहे. यात पालकांचे अर्धे जुळणारे ‘बोनमॅरो’ प्रत्यारोपण आहे. सध्या यावर ‘क्लिनीकल ट्रायल’सुरू आहे. या शिवाय सिकलसेलवरील उपचारासाठी ‘जीन थेरपी’वरही संशोधन सुरू आहे. नागपूरच्या मेडिकलमध्ये होणाऱ्या ‘द सेंटर आॅफ एक्सलन्स इन सिकलसेल सेंटर’मध्ये तांत्रिक सल्लागार म्हणून सेवा देणार आहे, असेही ते म्हणाले. यावेळी सिकलसेल सेंटरच्या नोडल अधिकारी डॉ. दीप्ती जैन उपस्थित होत्या. दरम्यान डॉ. क्रिष्णमूर्ती व डॉ. जैन यांनी मेडिकलला भेट देऊन अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांच्याशी चर्चा केली.

Web Title: 44 thousand children suffering from sickle cell in India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य