नागपूर-मुंबई दुरांतोत हवालाचे ३० लाख तर मुंबई-नागपूर दुरांतोत सोन्याची २९ पाकिटे जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2017 02:22 PM2017-12-07T14:22:40+5:302017-12-07T14:29:36+5:30

दुरांतो एक्स्प्रेसने हवालाचे ३० लाख रुपये घेऊन मुंबईला जाण्यासाठी नागपूर रेल्वेस्थानकावर आलेल्या एका आरोपीला रेल्वे सुरक्षा दलाच्या गुन्हे शाखेने बुधवारी रात्री अटक केली. तर गुरुवारी मुंबईहून नागपूरला येणाऱ्या दुरांतोत सोन्याची २९ पाकिटे आणणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली.

30 lakhs of hawala in Nagpur-Mumbai Durant and 29 gold in Mumbai-Nagpur Durant | नागपूर-मुंबई दुरांतोत हवालाचे ३० लाख तर मुंबई-नागपूर दुरांतोत सोन्याची २९ पाकिटे जप्त

नागपूर-मुंबई दुरांतोत हवालाचे ३० लाख तर मुंबई-नागपूर दुरांतोत सोन्याची २९ पाकिटे जप्त

Next
ठळक मुद्देआरपीएफ गुन्हे शाखेची कारवाईदोन आरोपींना मुद्देमालासह अटकआयकर विभागाकडे सोपविले

आॅनलाईन लोकमत
नागपूर :


मिळालेल्या माहितीच्या आधारे पहिली कारवाई बुधवारी रात्री ८.३० वाजता होम प्लॅटफार्मवर उभ्या असलेल्या १२२९० नागपूर-मुंबई दुरांतो एक्स्प्रेसच्या कोच क्रमांक एस-६, बर्थ ५७ वरून करण्यात आली. कारवाईबाबत मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त ज्योती कुमार सतीजा यांनी सांगितले की, आरपीएफच्या गुन्हे शाखेला एक व्यक्ती रात्री हवालाची रक्कम घेऊन जाणार असल्याची गुप्त माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या चमूने होम प्लॅटफार्मवर पाहणी केली. गुन्हे शाखेचे निरीक्षक भगवान इप्पर, संजय पुरकाम, विजय पाटील, दीपक वानखेडे, किशोर चौधरी, नीळकंठ गोरे यांना रात्री ८.३० वाजता दुरांतो एक्स्प्रेसच्या कोच एस-६ मध्ये एक प्रवासी संशयास्पद स्थितीत आढळला. त्याला लगेच ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. त्याने आपले नाव महेंद्र तरोडे (२८) रा. अकोला सांगितले. त्याला इंद्रायणी कुरीअरच्या वतीने ७ हजार रुपये वेतन आणि प्रत्येक ट्रीपमागे ७०० रुपये मिळत असल्याचे सांगितले. त्याने काहीच ठोस माहिती न दिल्यामुळे त्याला आरपीएफ ठाण्यात आणण्यात आले. तेथे त्याच्या ट्रॅव्हल बॅगची तपासणी केली असता त्यात ३० लाख रुपये आढळले. त्यात २८ लाख रुपयांच्या २ हजाराच्या नोटा तसेच उर्वरित ५०० रुपयांच्या नोटा आढळल्या. त्याची अधिक चौकशी केली असता संबंधित प्रवाशाने ही रक्कम मुंबईला नेत असल्याची माहिती दिली. त्यानंतर लगेच आयकर विभागाला सूचना देण्यात आली. आयकर विभागाची चमू गुरुवारी आरपीएफ ठाण्यात पोहोचल्यानंतर आरोपी आणि रक्कम त्यांच्या सुपूर्द करण्यात आली.
 
मुंबई-नागपूर दुरांतोत सोन्याची २९ पाकिटे जप्त
मुंबईवरून दुरांतो एक्स्प्रेसने नागपुरात सोन्याचे २९ पाकिटे आणणाऱ्या आरोपीला रेल्वे सुरक्षा दलाच्या गुन्हे शाखेने गुरुवारी सकाळी मुद्देमालासह अटक केली आहे.
रेल्वे सुरक्षा दलाच्या गुन्हे शाखेला रेल्वेगाडी क्रमांक १२२८९ मुंबई-नागपुर दुरांतो एक्स्प्रेसमध्ये सोन्याची पाकिटे येणार असल्याची गुप्त माहिती मिळाली. गुन्हे शाखेने ही माहिती कसारा येथील आरपीएफला दिली. त्या नुसार कसारा येथील आरपीएफ जवान संजय पाटील आणि इगतपुरी येथील आरपीएफचा जवान सज्जन गोरे हे दुरांतो एक्स्प्रेसमध्ये चढले. त्यांनी आरक्षणाच्या यादीतून शाम हे नाव शोधुन काढले असता आरोपी एस-७, बर्थ ४९ वर प्रवास करीत असल्याचे आढळले. त्यांनी आरोपीवर नागपुरात येईपर्यंत पाळत ठेवली. नागपुरात दुरांतो एक्स्प्रेस आल्यानंतर गुन्हे शाखेचे निरीक्षक भगवान इप्पर, आरपीएफ ठाण्याचे निरीक्षक वीरेंद्र वानखेडे, संजय पुरकाम, विजय पाटील, दीपक वानखेडे, किशोर चौधरी, नीळकंठ गोरे यांनी आरोपीला सोन्याच्या २९ पाकिटांसह अटक केली. आरोपीने आपले नाव शाम बंकुवाल (३८) रा. अकोला असे सांगून आपण इंद्रायणी कुरीयरसाठी काम करीत असल्याचे सांगितले. या कामासाठी ८ हजार रुपये वेतन आणि प्रत्येक फेरीमागे ७०० रुपये मिळत असल्याची माहिती त्याने दिली. आरपीएफने आयकर विभागाचे अधिकारी आणि सोन्याचे मुल्यमापन करणाऱ्या तज्ज्ञांना बोलावले. मुल्यमापन केल्यानंतर जप्त केलेले सोने आरोपीसह आयकर विभागाच्या स्वाधीन करण्यात आले.

Web Title: 30 lakhs of hawala in Nagpur-Mumbai Durant and 29 gold in Mumbai-Nagpur Durant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Crimeगुन्हा