२५०० मेगावॅट क्षमतेचे सौर-औष्णिक संकरित प्रकल्प उभारणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2018 11:00 PM2018-11-16T23:00:21+5:302018-11-16T23:02:12+5:30

येणाऱ्या काळात महाराष्ट्रात लोड शेडिंग होणार नाही याची पूर्ण खबरदारी घेण्याचे आदेश ऊर्जामंत्री चंद्र्रशेखर बावनकुळे यांनी महानिर्मितीच्या अधिकाऱ्यांना दिले. उन्हाळाच्या काळात विजेच्या वाढत्या मागणीमुळे विजेची कमतरता निर्माण होते. परिणामी भारनियमनची परिस्थिती उद्भवते. हे भारनियमन टाळण्यासाठी आणि विजेचे योग्य नियोजन करण्यासाठी ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी महानिर्मितीच्या अधिकाऱ्यांना औष्णिक विद्युत संचांची कार्यक्षमता वाढवून अधिक वीज निर्मिती करण्याचे आदेश दिले.

2500 MW solar-thermal hybridization project will be set up | २५०० मेगावॅट क्षमतेचे सौर-औष्णिक संकरित प्रकल्प उभारणार

२५०० मेगावॅट क्षमतेचे सौर-औष्णिक संकरित प्रकल्प उभारणार

Next
ठळक मुद्देऊर्जामंत्री बावनकुळे : नियमित वीज पुरवठ्यासाठी उपाययोजना

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : येणाऱ्या काळात महाराष्ट्रात लोड शेडिंग होणार नाही याची पूर्ण खबरदारी घेण्याचे आदेश ऊर्जामंत्री चंद्र्रशेखर बावनकुळे यांनी महानिर्मितीच्या अधिकाऱ्यांना दिले. उन्हाळाच्या काळात विजेच्या वाढत्या मागणीमुळे विजेची कमतरता निर्माण होते. परिणामी भारनियमनची परिस्थिती उद्भवते. हे भारनियमन टाळण्यासाठी आणि विजेचे योग्य नियोजन करण्यासाठी ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी महानिर्मितीच्या अधिकाऱ्यांना औष्णिक विद्युत संचांची कार्यक्षमता वाढवून अधिक वीज निर्मिती करण्याचे आदेश दिले.
मधल्या काळात कोळशाच्या तुटवड्यामुळे महाराष्ट्राच्या काही भागात भारनियमनची परिस्थिती निर्माण झाली होती. अशी परिस्थिती पुन्हा निर्माण होऊ नये यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी पावले उचलत बैठकीचे आयोजन केले होते.
वीज निर्मिती केंद्रांना कोळशाचा तुटवडा होऊ नये म्हणून दररोज ३५ रैक कोळसा वीज निर्मिती केंद्राला पुरवला जाईल. महानिर्मितीच्या औष्णिक विद्युत केंद्रातून साडे सात हजार मेगावॅट वीज निर्मितीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे अशी माहिती ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी दिली. सौर ऊर्जा स्वस्त व शाश्वत असल्यामुळे येणाऱ्यां काळात पारंपरिक ऊर्जेला चांगला पर्याय उपलब्ध होईल, या दृष्टीने औष्णिक संचासोबत सोलर संचही लवकरच उभारले जातील. महानिर्मिती कंपनीकडील उपलब्ध असलेल्या जमिनींवर २५०० मेगावॉट क्षमतेचे सौर-औष्णिक संकरित प्रकल्प उभारण्यात येणार आहेत असेही ते म्हणाले.

Web Title: 2500 MW solar-thermal hybridization project will be set up

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.