वीज निर्मिती कंपनीची २ कोटी, २७ लाखांनी फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2018 12:00 AM2018-08-19T00:00:10+5:302018-08-19T00:01:51+5:30

महाराष्ट्र वीज निर्मिती कंपनीची २ कोटी, २७ लाखांनी फसवणूक करणाऱ्या धंतोलीतील मे. निहार स्टील प्रा. लि.च्या संचालक, व्यवस्थापक आणि नोकरांविरुद्ध धंतोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

2 crore 27 lakh of electricity generation company fraud | वीज निर्मिती कंपनीची २ कोटी, २७ लाखांनी फसवणूक

वीज निर्मिती कंपनीची २ कोटी, २७ लाखांनी फसवणूक

googlenewsNext
ठळक मुद्देपरळी केंद्राकडून तक्रार : निहार स्टील लि. विरुद्ध धंतोलीत गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महाराष्ट्र वीज निर्मिती कंपनीची २ कोटी, २७ लाखांनी फसवणूक करणाऱ्या धंतोलीतील मे. निहार स्टील प्रा. लि.च्या संचालक, व्यवस्थापक आणि नोकरांविरुद्ध धंतोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मर्यादित नवीन औष्णिक विद्युत केंद्र परळी वैजनाथ (ता. परळी, जि. बीड) सोबत सदर कंपनीचा करार झाला होता. त्यानुसार, वीज निर्मिती कंपनीला निहार स्टील कंपनीकडून स्टील पुरवठा करायचा होता. त्यानुसार, सहायक अभियंता आर. ए. पेठे यांच्या ताब्यातील २२ धनादेश (ज्यात २ कोटी, २७ लाख, १०, ५०२ रुपये नमूद करण्यात आले) १८ ते २१ जुलै २०१८ या कालावधीत निहार स्टीलच्या संचालक, व्यवस्थापकांकडे पोहचले. ही रक्कम निहार स्टील लि. च्या कोटक महिंद्रा बँक शाखा धंतोलीच्या खात्यात जमाही झाली. मात्र कराराप्रमाणे वीज कंपनीला स्टीलचा पुरवठा न करता जाणीवपूर्वक वीज कंपनीसोबत गैरव्यवहार करण्यात आल्याचा आरोप आहे. निहारच्या संचालक, व्यवस्थापकाचे कट कारस्थान लक्षात आल्यानंतर वीज कंपनीचे मुख्य व्यवस्थापक राजेश गणपतराव मोराळे (वय ४४, रा. परळी ) यांनी धंतोली पोलिसांकडे तक्रार नोंदवली. पोलिसांनी चौकशी केल्यानंतर शनिवारी निहार स्टीलचे संचालक, व्यवस्थापक आणि नोकारांविरुद्ध जाणीवपूर्वक गैरकारस्थान करून फसवणूक केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला.
पोलिसांकडून माहिती देण्यास टाळाटाळ
हा गुन्हा नेमका किती जणांविरुद्ध दाखल केला आणि त्यांची नावे काय, या संबंधाने गुन्हा दाखल करणारे एएसआय नारायण भलावी यांच्याकडे तसेच धंतोली पोलीस ठाण्यात वारंवार संपर्क विचारणा केली. मात्र, त्यांच्याकडून सविस्तर माहिती उपलब्ध होऊ शकली नाही.

Web Title: 2 crore 27 lakh of electricity generation company fraud

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.