11 hutments burnt in Nagpur fire | नागपुरात आगीत ११ झोपड्या जळून खाक

ठळक मुद्देमानेवाडा-बेसा मार्गावरील मजूर झाले निवारा वंचित

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरातील मानेवाडा-बेसा रोडवरील बादल किराणा दुकानाच्या बाजूच्या झोपड्यांना बुधवारी सकाळी १० च्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत ११ झोपड्या जळून खाक झाल्या. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही; मात्र झोपडीतील कपडे, पैसे, धान्य, छोटे-मोठे सामान जळून खाक झाले आहे.
मानेवाडा-बेसा मार्गावर झोपड्या उभारून मजूर कुटुंबासह वास्तव्यास आहेत. सकाळी अचानक या झोपड्यांना आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन विभागाच्या तीन गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. जवानांनी प्रयत्नांनी ही आग आटोक्यात आणली. प्लास्टिक आणि सुक्या लाकडांच्या मदतीने या झोपड्या उभारण्यात आल्याने आग जास्त भडकल्याची माहिती अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. आग लागण्याचे कारण अद्याप समजू शकले नाही.
या गरीब कुटुंबांनी मोलमजुरी करून एकेक पैसा जमवला होता. तो सुद्धा आगीत जळाला. यात ५० हजाराहून अधिक नुकसान झाले.


Web Title: 11 hutments burnt in Nagpur fire
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.