पाच वर्षांत १० हजारांवर डॉक्टरांनी नाकारली बंधपत्रित सेवा; ग्रामीण भागात जाण्यास नाखूष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2017 07:49 PM2017-12-18T19:49:16+5:302017-12-18T19:50:09+5:30

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून शिक्षण घेतल्यानंतर प्रत्येक डॉक्टरला एक वर्षाचे बंधपत्र पूर्ण करण्यासाठी मेळघाट, गडचिरोली, गोंदिया येथील ग्रामीण भागात पाठविले जाते. मात्र गेल्या पाच वर्षांत १० हजार ६८३ डॉक्टरांनी बंधपत्रित सेवा पूर्ण केली नाही. त्यांची नोंदणीधोक्यात आली असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी दिली.

10 thousand doctors rejected service in rural area since five years | पाच वर्षांत १० हजारांवर डॉक्टरांनी नाकारली बंधपत्रित सेवा; ग्रामीण भागात जाण्यास नाखूष

पाच वर्षांत १० हजारांवर डॉक्टरांनी नाकारली बंधपत्रित सेवा; ग्रामीण भागात जाण्यास नाखूष

googlenewsNext
ठळक मुद्देबंधपत्रमुक्तीचे प्रमाणपत्र न देणारे डॉक्टर्स बोगस समजले जातील

आॅनलाईन लोकमत
नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून शिक्षण घेतल्यानंतर प्रत्येक डॉक्टरला एक वर्षाचे बंधपत्र पूर्ण करण्यासाठी मेळघाट, गडचिरोली, गोंदिया येथील ग्रामीण भागात पाठविले जाते. मात्र गेल्या पाच वर्षांत १० हजार ६८३ डॉक्टरांनी बंधपत्रित सेवा पूर्ण केली नाही. अशा डॉक्टरांना नोटीसा बजाविण्यात आल्या असून त्यांची नोंदणीदेखील धोक्यात आली असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी दिली. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टर ग्रामीण भागात जाण्यास तयार होत नसल्याबद्दल डॉ.नीलम गोºहे, संजय दत्त, शरद रणपिसे इत्यादी सदस्यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता.
बंधपत्रित सेवा न करणाऱ्या उमेदवारांना महाराष्ट्र वैद्यक परिषदेच्या नोंदणीचे नूतनीकरण करून देण्याच्या वेळेस बंधपत्रमुक्त केल्याचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. ज्या डॉक्टरांना नोंदणीचे नूतनीकरण प्राप्त होणार नाही, त्यांना बोगस डॉक्टर म्हणून समजण्यात येईल, असेदेखील उत्तरातून स्पष्ट करण्यात आले.

Web Title: 10 thousand doctors rejected service in rural area since five years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.