इतिहासाचे भीष्माचार्य

By Admin | Published: August 2, 2014 02:38 PM2014-08-02T14:38:54+5:302014-08-02T14:38:54+5:30

इतिहास संशोधनाला कसलीही प्रतिष्ठा नव्हती त्या काळात जाणीवपूर्वक या विषयाला वाहून घेणार्‍यांमध्ये डॉ. ब्रह्मनंद देशपांडे अग्रणी होते. येत्या ६ ऑगस्ट रोजी त्यांचा प्रथम स्मृतिदिन आहे. त्यानिमित्त केलेले त्यांच्या कामाचे स्मरण..

History of Bhishmacharya | इतिहासाचे भीष्माचार्य

इतिहासाचे भीष्माचार्य

googlenewsNext

 किरण देशमुख

 
अनमोल इतिहास बोलका करण्याचे कार्य नि:पक्षपातीपणे करणार्‍या इतिहासकारांत ज्येष्ठ संशोधक, गुरुवर्य डॉ. ब्रह्मनंद देशपांडे यांचा समावेश आवर्जून करावा लागतो. त्यांचा जन्म दि. १३ जून १९४0 रोजी, विदर्भातील रिसोड (जि. वाशिम) येथे वतनदार कुटुंबात झाला. ते लहानपणापासूनच अत्यंत बुद्धिमान आणि चिकित्सक होते. 
विद्याधनं सर्वधनप्रधानम्’ हे डॉ. देशपांडे यांना माहीत होते. म्हणूनच त्यांनी इतिहासातील ‘डॉक्टरेट’ (१९९६) व डी.लिट. (२00२) या सवरेत्तम पदव्या नागपूर विद्यापीठातून प्राप्त केल्या. पण पदे वा पदव्या यांच्या सहवासात गुरुवर्य कधीच रमले नाहीत. स्वत:च्या प्रकांड पांडित्यातून दि गुप्ता अँडमिनिस्ट्रेशन, देवगिरीचे यादव, शोधमुद्रा- खंड १ ते ६, चक्रपाणी, शब्दवेध, सप्तपर्णी, मयूरपंख, स्टडीज् इन इपिग्राफी खंड १, अजिंठा, वेरुळ, दौलताबाद इत्यादी उत्तमोत्तम दज्रेदार ग्रंथ लिहून ‘इतिहासाचार्य’ हा सन्मान उचित ठरविला. सार्‍या देशाचा, धर्मांचा वा संस्कृतीचा इतिहास, त्यातील अभिलेख, ताम्रपट, नाणी, हस्तलिखिते त्यांना अगदी मुखोद्गत असत. एखाद्या विषयावरील सरांचे भाष्य वा भाषण अचूक संदर्भासह विस्तृत असे. विषयाची जाण आणि वेळेचे भान ठेवूनच ते बोलत असत. 
 प्रतिपाद्य विषयाची सूत्रबद्ध सखोल मांडणी करून, प्रस्थापित विचारांपेक्षा नवीनच मते निर्भिडपणे प्रतिपादन करणे, ही त्यांची वाक्शैली होती. मुद्देसूद विवेचन, पुराव्यांसह सविस्तर विश्लेषण आणि आशयपूर्ण वर्णन करणे ही सरांच्या प्रभावी वक्तृत्वाची खास वैशिष्ट्ये होती. त्यामुळेच तर, त्यांची देशाच्या सर्व भागात झालेली व्याख्याने श्रवणीय तसेच, स्मरणीय ठरलीत. 
 इतिहासाशिवाय गुरुवर्यांचा धर्मशास्त्र, वेद-उपनिषदे, तत्त्वज्ञान, संगीतादि अनेक विषयांवर ‘अधिकार’ होता. प्राचीन कला स्थापत्य विशेषत: अजिंठा-वेरुळ, तेथील जगविख्यात ‘कैलास’ लेणे तर, सरांचे ‘जीव की प्राण’च होते. 
  दज्रेदार खुसखुशीत विनोद व शुद्ध कोट्यांची त्यांची वाक्यशैली भारावून टाकणारी होती. एकदा तर, गुरुवर्यांनी फोनद्वारे स्त्री आवाज उच्चारून सौ. देशमुखांच्या मनात माझ्याविषयी काही क्षण ‘संशयकल्लोळ’च निर्माण केला. पण, काही क्षणांतच स्वत:च्या मूळ आवाजात हसतच स्पष्टीकरणही दिले. त्यांचा स्वभाव अत्यंत मिस्कील होता. दुसर्‍याच्याही जीवनात हसू फुलत राहावे, हीच त्यांची खरी भावना होती.  डॉ. देशपांडे मराठी, हिंदी, संस्कृत, इंग्रजी, गुजराथी, कन्नड, बंगाली, उर्दू, बुंदेलखंडी, छत्तीसगडी इ. भाषांचे उत्तम जाणकार होते. ब्रrी, नागरी, महानुभाविय सकळी सुंदरी इत्यादी लिपींचा त्यांचा अभ्यास उत्कृष्ट होता. 
संशोधनाच्या क्षेत्रात सत्यता, सचोटी, सहकार्य, समन्वय आणि संवाद असावा अशी त्यांची प्रामाणिक भूमिका होती. अर्थात, वैचारिक टीकाकारांविषयी त्यांच्या मनी शत्रुत्वाची भावना कधीच नव्हती. स्वच्छ व प्रामाणिक संशोधनासाठी ‘निंदकाचे घर असावे शेजारी’ असेच त्यांना नेहमी वाटत असे. म्हणूनच, लहानांविषयी वात्सल्य, बरोबरींच्याविषयी स्नेहभाव आणि ज्येष्ठांविषयी आदराची भावना सतत ठेवणार्‍या संशोधक डॉ. ब्रह्मनंद देशपांडे यांच्याविषयी प्रत्येकालाच 
वदनं प्रसाद- सदनं सदयं हृदयं सुधामुचो वाच:! 
करणं परोपकरणं केपांन ते वंद्या:?!!
 असे नेहमीच वाटत राहणार. 
गुरुवर्यांच्या पुण्यस्मृतीला विनम्र अभिवदन..
(लेखक इतिहासाचे अभ्यासक आहेत.)

Web Title: History of Bhishmacharya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.