वैद्यनाथच्या दुर्घटने प्रकरणी कारखाना प्रशासनावर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करा : धनंजय मुंडे

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2017 04:48 PM2017-12-10T16:48:07+5:302017-12-10T16:48:25+5:30

वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यातील उसाच्या रसाचा हौद फुटुन झालेली दुर्लघटना अतिशय दुर्देवी आहे. घटनेत पाच व्यक्तींचा मृत्यु होऊनही अद्याप साधा गुन्हा ही दाखल झालेला नाही. या घटनेस कारखाना प्रशासन जबाबदार असल्याने या प्रकरणी सदोष मुनष्यवधाचा गुन्हा दाख करण्याची मागणी विधान विरोधी पक्षनेते ना.धनंजय मुंडे यांनी केली आहे.

Due to Vaidyanathan's accident case, file FIR filed against Manohar's lawyer, Dhananjay Munde | वैद्यनाथच्या दुर्घटने प्रकरणी कारखाना प्रशासनावर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करा : धनंजय मुंडे

वैद्यनाथच्या दुर्घटने प्रकरणी कारखाना प्रशासनावर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करा : धनंजय मुंडे

Next

परळी: वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यातील उसाच्या रसाचा हौद फुटुन झालेली दुर्लघटना अतिशय दुर्देवी आहे. घटनेत पाच व्यक्तींचा मृत्यु होऊनही अद्याप साधा गुन्हा ही दाखल झालेला नाही. या घटनेस कारखाना प्रशासन जबाबदार असल्याने या प्रकरणी सदोष मुनष्यवधाचा गुन्हा दाख करण्याची मागणी विधान विरोधी पक्षनेते ना.धनंजय मुंडे यांनी केली आहे.

शुक्रवारी झालेल्या दुर्घटने प्रकरणी आज मुंडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. कारखाना प्रशासनाच्या दबावाखाली येऊन पोलिस प्रशासनाने मुंडे यांना घटनास्थळी जाण्यापासुन रोखण्याचा प्रयत्न केला. त्यावर लोकप्रतिनिधींना घटनास्थळी जाऊ न देण्याचा हा प्रकार पोलिस मंत्र्यांच्या दबावाखाली करीत असनु, या प्रकरणी आपण सभागृहात आवाज उठवु असे सांगितले. या घटनेत मृत्यु झालेल्या लिंबोटा, देशमुख टाकळी, गाढे पिंपळगावं येथील कामगारांच्या कुटुंबियांची भेट घेवुन त्यांनी त्यांचे सांत्वन केले. घटनेत मृत झालेले कर्मचारी हे घरातील प्रमुख असल्यामुळे त्यांचे कुटुंब उघड्यावर पडले आहे. या कुटूंबियांना ताताडीने 10 लाख रूपयांची मदत द्यावी तसेच जखमींना 5 लाख रूपये मदत देण्याची मागणी ही त्यांनी केली. घटनेचे आपल्याला राजकारण करायचे नाही मात्र ज्या पध्दतीने आपल्याला रोखण्याचा प्रयत्न झाला ते पाहता कारखाना प्रशासनच या घटनेत जबाबदार असल्याचा पुनरूच्चार त्यांनी केला.

यावेळी राष्ट्रवादी युवक प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य अजय मुंडे, डॉ.संतोष मुंडे,  मार्केट कमिटीचे सभापती सुर्यभान नाना मुंडे, शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, जिल्हा उपाध्यक्ष  प्रा.डॉ.मधुकर आघाव, जिल्हा उपाध्यक्ष माऊली गडदे, आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.
 

Web Title: Due to Vaidyanathan's accident case, file FIR filed against Manohar's lawyer, Dhananjay Munde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.