2016 चे यशवंतराव चव्हाण राज्य वाङमय पुरस्कार जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2017 04:01 PM2017-12-11T16:01:53+5:302017-12-11T16:03:58+5:30

मराठी भाषा विभागाच्या वतीने प्रदान करण्यात येणाऱ्या स्व.यशवंतराव चव्हाण राज्य वांङमय पुरस्कार २०१६ ची यादी जाहीर करण्यात आली आहे. मराठी भाषेतील उत्कृष्ट मराठी वाङमय निर्मितीस हे पुरस्कार प्रदान करण्यात येतात.

yashwantrao chavan state literature award 2016 | 2016 चे यशवंतराव चव्हाण राज्य वाङमय पुरस्कार जाहीर

2016 चे यशवंतराव चव्हाण राज्य वाङमय पुरस्कार जाहीर

googlenewsNext

नागपूर : मराठी भाषा विभागाच्या वतीने प्रदान करण्यात येणाऱ्या स्व.यशवंतराव चव्हाण राज्य वांङमय पुरस्कार २०१६ ची यादी जाहीर करण्यात आली आहे. मराठी भाषेतील उत्कृष्ट मराठी वाङमय निर्मितीस हे पुरस्कार प्रदान करण्यात येतात. काव्य , नाटक, एकांकिका, कांदबरी, लघुकथा, ललितगद्य, दलित साहित्य, शिक्षण शास्त्र, बाल वाङमय, आदी ३५ प्रकारात विविध लेखक, साहित्यिकांना हे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. मराठी भाषामंत्री विनोद तावडे यांनी आज प्रसिध्दी पत्रकाव्दारे आज घोषणा केली.

२०१६ साठीचा उत्कृष्ट मराठी वांङमय पुरस्कारासाठी ज्या लेखक व साहित्यिकांची निवड करण्यात आली आहे त्या पुरस्कारार्थींची यादी खालीलप्रमाणे. सन 2016 या वर्षाकरीता उत्कृष्ट मराठी वाङमय निर्मिती स्व.यशवंतराव चव्हाण राज्य वाङमय पुरस्कारप्राप्त लेखक / साहित्यिकांची यादी-

1. प्रौढ वाङ्मय - काव्य
कवी केशवसूत पुरस्कार
रु.1,00,000/-
दिनकर मनवर
अजूनही बरंचकाही बाकी
पोएट्री प्रिमेरो पेपरवॉल मीडिया ॲण्ड पब्लिशिंग प्रा.लि. चे इम्प्रिंट, मुंबई
2. प्रथम प्रकाशन-काव्य
बहिणाबाई चौधरी पुरस्कार
रु.50,000/-
अजित अभंग
गैबान्यावानाचं
पोएट्री प्रिमेरो पेपरवॉल मीडिया ॲण्ड पब्लिशिंग प्रा.लि. चे इम्प्रिंट, मुंबई
3.प्रौढ वाङ्मय - नाटक/एकांकिका
राम गणेश गडकरी पुरस्कार
रु.1,00,000/-
डॉ. आनंद नाडकर्णी
त्या तिघांची गोष्ट
मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस, मुंबई
4. प्रथम प्रकाशन-नाटक/एकांकिका
विजय तेंडूलकर पुरस्कार
रु.50,000/-
प्रा.के.डी.वाघमारे
क्षितिजापलीकडे
निर्मल प्रकाशन, नांदेड
5. प्रौढ वाङ्मय - कादंबरी
हरी नारायण आपटे पुरस्कार
रु.1,00,000/-
सदानंद देशमुख
चारीमेरा
पॉप्युलर प्रकाशन, मुंबई
6.  प्रथम प्रकाशन- कादंबरी
श्री.ना.पेंडसे पुरस्कार
रु.50,000/-
श्रीरंजन आवटे
सिंगल मिंगल
राजहंस प्रकाशनप्रा.लि., पुणे
7. प्रौढ वाङ्मय-लघुकथा
दिवाकर कृष्ण पुरस्कार
 रु.1,00,000/-
नीलम माणगावे
निर्भया लढते आहे
ग्रंथाली प्रकाशन, मुंबई
8. प्रथम प्रकाशन - लघुकथा
ग.ल.ठोकळ पुरस्कार
रु.50,000/-
दुर्योधन अहिरे
जाणीव
यशोदीप पब्लिकेशन्स, पुणे
9. प्रौढ वाङ्मय - ललितगद्य
(ललित विज्ञानासह)
अनंत काणेकर पुरस्कार
रु.1,00,000/-
विनायक पाटील
गेले लिहायचे राहून
राजहंस प्रकाशन प्रा.लि., पुणे
10.  प्रथम प्रकाशन - ललितगद्य
ताराबाई शिंदे पुरस्कार
रु.50,000/-
रश्मीकशेळकर
भुईरिंगण
मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस, ठाणे
11. प्रौढ वाङ्मय - विनोद
श्रीपाद कृष्ण कोल्हटकर पुरस्कार
रु.1,00,000/-
बब्रूवान रुद्रकंठावार
आमादमी  विदाऊट पार्टी
जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद
12. प्रौढ वाङ्मय - चरित्र
न.चिं.केळकर पुरस्कार
रु.1,00,000/-
अरुण करमरकर
पोलादी राष्ट्रपुरुष
स्नेहल प्रकाशन, पुणे
13. प्रौढ वाङ्मय -आत्मचरित्र
लक्ष्मीबाई टिळक पुरस्कार
रु.1,00,000/-
राम नाईक
चरैवेति ! चरैवेति !!
इंकिंग इनोव्हेशन्स,मुंबई
14. प्रौढ वाङ्मय- समीक्षा/वाङ्मयीन संशोधन/सौंदर्यशास्त्र/ललितकला आस्वादपर लेखन
श्री.के.क्षीरसागर पुरस्कार
रु.1,00,000/-
विश्राम गुप्ते
नवं जग, नवी कविता
संस्कृती प्रकाशन, पुणे
15.  प्रथम प्रकाशन -                समीक्षा सौंदर्यशास्त्र
रा.भा.पाटणकर पुरस्कार
रु.50,000/-
बाळू दुगडूमवार
बाबा आमटे यांची गीते : आकलन आणि आस्वाद
अभंग प्रकाशन, नांदेड
16.  प्रौढ वाङ्मय - राज्यशास्त्र/समाजशास्त्र
डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार
रु.1,00,000/-
आतिवास सविता
भय इथले...
तालिबानी सावट :
प्रत्यक्ष अनुभव
राजहंस प्रकाशनप्रा.लि., पुणे
17. प्रौढ वाङ्मय - इतिहास
शाहू महाराज पुरस्कार
रु.1,00,000/-
विजय आपटे
शोध महाराष्ट्राचा
राजहंस प्रकाशनप्रा. लि., पुणे
18.  प्रौढ वाङ्मय - भाषाशास्त्र/व्याकरण
नरहर कुरूंदकर पुरस्कार
रु.1,00,000/-
तन्मय केळकर
मैत्री संस्कृतशी
रोहन प्रकाशन, पुणे
19.  प्रौढ वाङ्मय - विज्ञान व तंत्रज्ञान (संगणक व इंटरनेटसह)
महात्मा जोतिराव फुले पुरस्कार
रु.1,00,000/-
डॉ.माधवी ठाकूरदेसाई
प्रकाशवेध
राजहंस प्रकाशन, पुणे
20.  प्रौढ वाङ्मय - शेती व शेतीविषयक पूरक व्यवसाय लेखनासह
वसंतराव नाईक पुरस्कार

  

Web Title: yashwantrao chavan state literature award 2016

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.