नागपूर नवीन विमानतळाचे काम लवकरच सुरू होणार - मुख्यमंत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2018 04:50 AM2018-01-29T04:50:01+5:302018-01-29T04:50:13+5:30

नागपुरातील नवीन विमानतळाला कॅबिनेटने मंजुरी दिली असून, सव्वादोन महिन्यात बांधकाम सुरू होणार आहे. त्यात कार्गो टर्मिनलचा समावेश राहणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे दिली.

 Work on Nagpur new airport will commence soon - CM | नागपूर नवीन विमानतळाचे काम लवकरच सुरू होणार - मुख्यमंत्री

नागपूर नवीन विमानतळाचे काम लवकरच सुरू होणार - मुख्यमंत्री

Next

नागपूर : नागपुरातील नवीन विमानतळाला कॅबिनेटने मंजुरी दिली असून, सव्वादोन महिन्यात बांधकाम सुरू होणार आहे. त्यात कार्गो टर्मिनलचा समावेश राहणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे दिली.
मनीषनगर उड्डाणपूल व भुयारी मार्गाचे भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते रविवारी झाले. त्यासाठी १३० कोटी खर्च होणार आहेत. अध्यक्षस्थानी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी होते. मुख्यमंत्री म्हणाले, मनीषनगर उड्डाणपुलासाठी १० वर्षे संघर्ष केला आहे. गडकरींनी उत्कृष्ट डिझाईन तयार करून दिले. त्यामुळे आता कुणाचेही घर तोडण्याची गरज पडणार नाही; शिवाय येथे होणारी वाहतुकीची कोंडी सुटणार आहे. चिंचभुवन येथील २२ घरांना जागा देऊ, असे मुख्यमंत्री म्हणाले.

अनधिकृत बांधकाम तोडा - गडकरी
रस्ते लहान आहेत, त्यावर अतिक्रमण होऊ नये. उड्डाणपुलाचे पूर्वीचे डिझाईन रद्द केले आहे. एल अ‍ॅण्ड टीचे तज्ज्ञ अभियंते व्यंकटरमण यांनी तयार केलेले उड्डाणपूल आणि भुयारी मार्गाचे डिझाईन तंतोतंत आहे. त्यात दोन पदरी भुयारी मार्ग आहेत. दर सात मिनिटाला रेल्वे फाटक बंद होते. उड्डाणपुलामुळे या भागातील लोकांची सोय होईल आणि वेळ वाचेल.

Web Title:  Work on Nagpur new airport will commence soon - CM

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.