जागावाटपाचे नवे सूत्र ठरणार!

By admin | Published: August 8, 2014 01:36 AM2014-08-08T01:36:12+5:302014-08-08T01:36:12+5:30

राज्यात सत्ता हवी असेल, तर तोंडात साखर आणि डोक्यावर बर्फ ठेवा असा कळीचा सल्ला खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांनी राज्यातील नेत्यांना राजधानीत बोलवून दिला.

Will be the new formula for the seat sharing! | जागावाटपाचे नवे सूत्र ठरणार!

जागावाटपाचे नवे सूत्र ठरणार!

Next
>रघुनाथ पांडे - नवी दिल्ली
राज्यात सत्ता हवी असेल, तर तोंडात साखर आणि डोक्यावर बर्फ ठेवा असा कळीचा सल्ला खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांनी राज्यातील नेत्यांना   राजधानीत बोलवून दिला. पवारांनी आपल्या नेत्यांना भोजन दिले मात्र त्यांचे कानही उपटल्याचे सूत्रंचे म्हणणो आहे. 
कोणत्या मापदंडावर आपण जागावाटपाचे सूत्र ठरवणार आहोत, हे पहिले ठरवू़ 2क्क्9 किंवा त्यापूर्वीच्या जागा वाटपाचे सूत्र आता लागू पडू शकत नाही़ त्यामुळे नवीन निर्णय घ्यावे लागतील, ही चर्चा मुख्यमंत्र्यांशी मुंबईत बोलून निश्चित करता येईल़ 
2क् ऑगस्टर्पयत पहिली यादी जाहीर करण्याची शक्यता आह़े मात्र, त्यापूर्वी पुढील दोन ते तीन दिवसांत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू़ यामध्ये दिवसांचा घोळ घालण्यात अर्थ नाही़ विरोधक प्रचारात पुढे निघाले आहेत़ त्यामुळे यापुढील निर्णय मुंबईतच होतील़ वाद होणार नाही, याची काळजी दोन्ही पक्षांनी घ्यायची आह़े जागा वाटपाचे सूत्र ठरवताना मागील वेळी तिस:या क्रमांकावर आघाडीतील जो उमेदवार होता, तो मतदार संघ यावेळी अदलाबदल करण्याचे संकेत दिले गेले आहेत़ मुख्यमंत्रीपद कोणाकडे असेल, त्याची चर्चा करू नका, असे स्पष्टपणो त्यांनी सांगितल्याचे सूत्रंचे म्हणणो आहे. ज्या जागांची यादीही तयार करण्यात आली.
 शिवाय वाटाघाटीची चर्चा पक्षाच्या वतीने कोण करेल, तेही ठरविण्यात आल्याचे सूत्रने सांगितले.
पक्षाच्या पारडय़ात जास्तीत जास्त जागा पाडून घेऊ, मात्र  निवडून येणाराच उमेदवार असेल, नातेवाईकांच्या शिफारशी करू नका, असे स्पष्ट धोरण राष्ट्रवादीने आखल्याचे सूत्रंनी सांगितले. राज्यातील आपली ताकद ओळखण्यासाठी सारेच पक्ष सव्र्हेक्षण करत आहेत. त्यातील प्राथमिक अंदाज लक्षात घेऊन  पक्षाला भरपूर मेहनत घ्यावी लागणार असल्याचे  सांगत, लोकसभा निवडणुकीत केलेल्या चुकांची पुनरूक्ती करू नका,असे स्पष्टपणो त्यांनी सांगितल्याचे सूत्र म्हणाले. 
बैठकीच्या सुरुवातीला बुधवारी सोनिया गांधींसोबत आपली कोणत्या विषयावर चर्चा झाली़ प्रतिकूल आणि अनुकूल मते कोणत्या विषयावर होती, ते पवार यांनी सर्वाना खुलपणाने सांगितल़े पण आघाडी तोडण्याचा विचारही मनात आणू नका आणि बेजबाबदार वक्तव्य टाळा , अशी सूचना त्यांनी केली़ 
लोकसभा निवडणुकीप्रमाणोच दमदार कॅम्पेन पक्ष राबवेल, संयुक्त सभा होतील मात्र आता प्रत्येकाला जबाबदारी खांद्यावर घ्यावी लागेल.त्यांनी काही मतदारसंघ लक्ष्यही केले आहेत. राष्ट्रवादीने 125 ते 13क् जागांवर दावा केला आहे, तर  काही समविचारी पक्षांना आघाडीत सहभागी करून घेण्याचे ठरविले आहे. ते कोणते पक्ष असावेत, त्यांच्या कोणत्या अपेक्षा आहेत, त्यांना राष्ट्रवादीच्या कोटय़ातून किती जागा द्याव्या लागतील, त्यावरही चर्चा झाली.महाराष्ट्रातील निवडणुकीत काँग्रेससोबतच्या आघाडीवर शिक्कामोर्तब केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, गृहमंत्री आर.आर. पाटील, जयंत पाटील यांच्यासह पक्षाच्या दोन्ही सभागृहातील खासदारांना बोलवून गुरूवारी रात्री त्यांच्या सहा, जनपथ या निवासस्थानी बैठक घेतली. खा. प्रफुल्ल पटेल, सुप्रिया सुळे, डी.पी. त्रिपाठी, माजिद मेनन, विजयसिंह मोहिते पाटील, धनंजय महाडिक आदी उपस्थित होते.
सूत्रंने सांगितले, की काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या सोबत बुधवारी पवार यांची झालेली भेट चांगलीच खरमरीत झाली. सोनिया यांनी पवारांना गेल्या काही काळातील गोष्टी अयोग्य झाल्याचे सांगून फटकारल्याची चर्चा राजधानीत गुरुवारी दिवसभर होती. 
 
च्2क् ऑगस्टर्पयत पहिली यादी जाहीर करण्याची शक्यता आह़े मात्र, त्यापूर्वी पुढील दोन ते तीन दिवसांत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू़ यामध्ये दिवसांचा घोळ घालण्यात अर्थ नाही़
 
च् विरोधक प्रचारात पुढे निघाले आहेत़ त्यामुळे यापुढील निर्णय मुंबईतच होतील़ वाद होणार नाही, याची काळजी दोन्ही पक्षांनी घ्यायची आह़े 

Web Title: Will be the new formula for the seat sharing!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.