इटलीची कन्या आणि वर्ध्याची सून फनफिला जेव्हा अष्टमीची पूजा बांधते..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2018 04:49 PM2018-10-17T16:49:26+5:302018-10-17T16:55:25+5:30

प्रेम विवाह झाल्यानंतर प्रथमच पतीसह भारत वारीवर आलेल्या रोम इटली येथील फनफिला चँग लिआॅन या कन्येने वर्ध्यातील श्री दुर्गा पूजा उत्सव समिती, वनमाली मेडीकल चौक, मेन रोड येथे अष्टमीच्या हवन पूजेला बसून भारतीय संस्कृतीचे धडे घेतले.

When the daughter of Italy and Wardha's daughter-in-law, Funfila builds worship of Ashtami .. | इटलीची कन्या आणि वर्ध्याची सून फनफिला जेव्हा अष्टमीची पूजा बांधते..

इटलीची कन्या आणि वर्ध्याची सून फनफिला जेव्हा अष्टमीची पूजा बांधते..

Next
ठळक मुद्देमराठमोळा पेहराव घालून केली पूजाअर्चना

महेश सायखेडे
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा: सध्या भारतीयांंकडून पाश्चात्त्य संस्कृतीचा अवलंब केलाा जात असला तरी विदेशातील नागरिक भारतीय संस्कृतीपुढे नतमस्तक होत असल्याचे दिसून येते. प्रेम विवाह झाल्यानंतर प्रथमच पतीसह भारत वारीवर आलेल्या रोम इटली येथील फनफिला चँग लिआॅन या कन्येने वर्ध्यातील श्री दुर्गा पूजा उत्सव समिती, वनमाली मेडीकल चौक, मेन रोड येथे अष्टमीच्या हवन पूजेला बसून भारतीय संस्कृतीचे धडे घेतले. इतकेच नव्हे तर त्यांचे पती सारंग काशीनाथ रडके यांच्यासह आदीशक्ती चरणी माथा टेकला.
मुळचे अकोला जिल्ह्यातील शेगाव येथील रहिवासी असलेल्या सारंग काशीराम रडके यांनी आपल्या मूळ गावी सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगचे धडे घेतले. त्यानंतर त्यांना कामानिमित्त विदेशवारीचा योग आला. याच दरम्यान दुबई येथे थाई शेफ असलेल्या फनफिला चँग लिआॅन यांच्याशी ओळख झाली. आठ वर्षांपूर्वीच्या ओळखीने प्रेमाकडे वाटचाल करीत पुढे हे दोघेही पे्रम विवाहाच्या बंधनात अडकले. सन २०१७ मध्ये प्रेमविवाह झाल्यानंतर गणपती उत्सवादरम्यान सारंग व फनफिला हे दोघेही सारंगचे मामा सुरेश बडे यांच्याकडे वर्धेत आले. त्यापूर्वी सारंगने वर्धा शहराशेजारी नालवाडी भागात सदनिका घेतली होती. त्याच सदनिकेत सध्या हे नवविवाहित दाम्पत्य वास्तव्याला आहे. बुधवारी या नवविवाहित दाम्पत्याने नवरात्री उत्सवादरम्यान अष्टमीच्या हवन पूजेला यजमान म्हणून हजेरी लावत आदीशक्तीच्या चरणी आपली श्रद्धा अर्पण केली. फनफिला हिने मराठमोळा पेहराव परिधान करून पूजा अर्चा केली, हे उल्लेखनीय.

जेवण करताना पडले पे्रमात
थाई शेफ असलेल्या फनफिला चँग लिआॅन हिच्याशी सारंग रडके याची ओळख दुबई येथे आयोजित एका फूड फेस्टिव्हलमध्ये झाली होती. याच ठिकाणी सारंग हा फनफिलाच्या प्रेमात पडला. फनफिला हिला भारतीय संस्कृतीचे विविध अंग आणि देवी-देवतांची माहिती जाणून घेण्याची उत्सुकता असल्याचे सारंग सांगतो.

इंग्रजीसह थाई भाषेचेच ज्ञान
फनफिला चँग लिआॅन हिला थाई आणि थोडी-थोडी इंग्रजी भाषा येते. तिला हिंदी किंवा मराठी भाषा बोलता येत नाही. शिवाय समजतही नाही. एखाद्या व्यक्तीने फनफिला हिच्याशी संवाद साधल्यावर सारंग हा त्या व्यक्तीचे म्हणणे थाई भाषेत ट्रान्सलेट करून फनफिला हिला समजावून सांगतो. मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेचे ज्ञान असलेल्या सारंग याने फनफिला हिच्या प्रेमात पडल्यानंतर थाई भाषा शिकली. सध्या तो चांगल्या प्रकारे थाई भाषा बोलतो.

गणरायाची केली आराधना
यंदाच्या गणेश उत्सवादरम्यान सारंग व फनफिला या नवदाम्पत्याने आपल्या नालवाडी येथील सदनिकेत विधीवत गणरायाची प्रतिष्ठापना केली. दहा दिवस पूजापाठ केल्यानंतर भाविकांना अन्नदानही त्यांनी केले.

इंडियात नमस्कार तर थाईमध्ये स्वधीखा असे संबोधिले जाते. भारतात मी पहिल्यांदाच आली असून येथे आल्यावर मला आनंद झाला आहे. येथील नागरिक चांगले आहेत. आमच्याकडे साडी परिधान केली जाते; पण भारतातील साडी वेगळीच आहे. येथे साडीमध्येही विविध प्रकार आहेत. राम, सीता व हनुमान याबाबत मी आपल्या देशातही माहिती घेतली होती. भारतात येऊन मला खऱ्या अर्थाने राम, सीता व हनुमानाची आराधना करणाऱ्यांना जाणता आले.
- फनफिला चँग लिआॅन, नव विवाहिता.

पत्नी फनफिला हिला भारतीय संस्कृतीबाबत आदर आहे. तिला ती जाणून घेण्याची उत्सुकताही आहे. मी हवन बघितला आहे. परंतु, लग्नानंतर हवनमध्ये बसण्याची फनफिला व माझी पहिलीच वेळ आहे. त्याबाबत तीही आनंदी आहे.
- सारंग रडके, नवविवाहित, सॉफ्टवेअर अभियंता.

आज आमच्या दुर्गा पुजा उत्सव समितीच्यावतीने आयोजित अष्टमीच्या हवन पूजेत भारतातील मुळ रहिवासी असलेला सारंग रडके व विदेशी असलेली आणि भारतीयांची सून असलेली फनफिला हे नव दाम्पत्य बसले आहे. अष्टमीच्या हवनात महाराष्ट्रात पहिल्यांदाच विदेशी महिला बसली असावी; असा दावा करीत नसलो तरी वर्धा जिल्ह्यातील ही पहिलीच घटना असावी असे मी या निमित्ताने सांगू शकतो.
- कमल कुलधरिया, माजी न.प. उपाध्यक्ष, वर्धा

Web Title: When the daughter of Italy and Wardha's daughter-in-law, Funfila builds worship of Ashtami ..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dasaraदसरा