VIDEO : टाकाऊ धातूंपासून सुबक मूर्ती

By Admin | Published: July 7, 2017 06:22 PM2017-07-07T18:22:04+5:302017-07-07T18:27:27+5:30

- निशिकांत पटवर्धन/ऑनलाइन लोकमत   पिंपरी-चिंचवड, दि. 07 - सध्या जेवणासाठी स्टिलची ताटे, वाट्या वापरल्या जातात. आता त्यांची जागा ...

VIDEO: Fine idol from waste metal | VIDEO : टाकाऊ धातूंपासून सुबक मूर्ती

VIDEO : टाकाऊ धातूंपासून सुबक मूर्ती

Next
- निशिकांत पटवर्धन/ऑनलाइन लोकमत
 
पिंपरी-चिंचवड, दि. 07 - सध्या जेवणासाठी स्टिलची ताटे, वाट्या वापरल्या जातात. आता त्यांची जागा अ‍ॅक्रलिक, प्लॅस्टिकच्या डिशने घेतली आहे. अ‍ॅल्युमिनिअची भांडी तर स्वयंपाक घरातून केव्हाच हद्दपार झाली आहेत. दररोजच्या वापरातील धातूच्या वस्तू जुन्या झाल्यावर एकतर भंगारामध्ये अथवा कच-यामध्ये टाकल्या जातात. मात्र, याच टाकाऊ वस्तूंपासून सुंदर सुबक मूर्तीमध्ये रुपांतर करण्याची किमया पिंपरीतील सुभाष हा तरुण उदरनिर्वाहासाठी करीत आहे. 
ओलसर रांगोळीची माती आणि धातू इत्यादींचा वापर करून सुंदर मूर्ती साकारण्याचे काम रस्त्याच्या कडेला चाललेले असते. टाकाऊ धातूंच्या वस्तूंपासून सुंदर सुबक देवदेवतांच्या मूर्ती साकारण्याचे काम आपण करतो. उदरनिर्वाहासाठी आपल्या वडिलांनी शिकविलेली कलाच उपयोगी ठरल्याचे सुभाष याने सांगितले.  
 रस्त्याच्या कडेला आडोसा पाहून एक छोटा खड्डा खणून कल्हई करण्यासाठी वापरण्यात येणा-या पंख्याद्वारे कोळसा टाकून आग निर्माण केली जाते. जुन्या धातूच्या वस्तू तोडून एका भांड्यात टाकल्या जातात. काहीच वेळात या वस्तू वितळतात. यासाठी घरगुती वापरातील जुने झालेले प्रेशर कुकर, भांडी, अ‍ॅल्युमिनियमच्या वस्तू, नळ, सिलिंग फॅनची पाती आणि दरवाजाचे कडीकोयंडे इत्यादींचा  वापर केला जातो. हा वितळलेला रस तयार झाल्यावर त्यावरील अनावश्यक घटक दूर केले जातात. एकीकडे वस्तू वितळविण्याचे काम सुरू असते. तर दुसरीकडे आवश्यक असलेल्या मूर्तीच्या साचा तयार करण्यात येतो. यासाठी ओलसर रांगोळीची माती वापरली जाते. मग हा तयार झालेला धातूचा रस साच्या मध्ये ओतण्यासाठी तयार असतो.  माती मळण्यापासून सुरू झालेला हा प्रवास सुंदर मूर्तीमध्ये रुपांतरीत होतो. 
टाकाऊ पासून टिकाऊ करण्यात आलेल्या मूर्ती पाहून ग्राहकही चार पैसे जास्त देतात. देवांच्या मूर्ती साकारण्याची कला माझ्या वडिलांनी मला शिकवली. जुन्या वस्तूंपासून नवनिर्मिती करण्याचे काम गेल्या अनेक  पिढ्यांपासून आपण करत आलो आहे. 
मूर्ती बनविण्यासाठी अ‍ॅल्युमिनियम, तांबे, पितळ अशा धातुंचा उपयोग केला जातो. या धातुंना वितळवून चौकोनी लोखंडी पेटीत असलेल्या मातीच्या छिद्रात ओतण्यात येते.   विविध देवी-देवतांचे साचे यासाठी तयार असतात.  पुढील पाच ते दहाच मिनिटात सुंदर मूर्तीमध्ये याचे रुपांतर होते. नटराज, श्रीकृष्ण, गणपती, शंकर, हनुमान, लक्ष्मी, त्रिमूर्ती या देवतांच्या बरोबरच गौतम बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, येशूख्रिस्त आदींच्या मूर्तीही तयार करता येतात. 
तयार झालेल्या मूर्तीमागे फार काही नफा कमवता येत  नाही. या तयार झालेल्या मूर्तीमागे ३० ते ३५ रुपयेच आपल्याला मिळतात. अ‍ॅल्युमिनियमच्या या मूर्तींवर नंतर ग्राहकाच्या पसंतीनुसार सोनेरी कलर वापरून चकाकी सुद्धा करता येते. अशा तयार झालेल्या या मूर्ती तिच्या आकारानुसार दर ठरवला जातो. साधारणपणे छोट्या आकारातील मूर्तींची किंमत ९० ते १५० रुपयांपर्यंत असते. 
सध्या अ‍ॅल्युमिनिअमची भांडी वापरात कमी असल्याने रोजचा धंदा कमी होत असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.
 
https://www.dailymotion.com/video/x84578c

Web Title: VIDEO: Fine idol from waste metal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.