VEDIO : डोळ्यांचे पारणे फेडणारा उक्षी धबधबा

By Admin | Published: August 1, 2016 07:51 PM2016-08-01T19:51:48+5:302016-08-01T19:51:48+5:30

मुळातच सुंदर असलेल्या कोकणाचे पावसाळ्यातले रूप अजूनच न्यारे ! जिकडे पाहावं तिकडे हिरवळ, वाऱ्यावर डोलणारी ओलीचिंब झाडे, पावसाने स्वच्छ धुतलेले रस्ते, मन उल्हसित करणारा

VEDIO: Eyewash waterfowl | VEDIO : डोळ्यांचे पारणे फेडणारा उक्षी धबधबा

VEDIO : डोळ्यांचे पारणे फेडणारा उक्षी धबधबा

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत

रत्नागिरी, दि. १ -  मुळातच सुंदर असलेल्या कोकणाचे पावसाळ्यातले रूप अजूनच न्यारे ! जिकडे पाहावं तिकडे हिरवळ, वाऱ्यावर डोलणारी ओलीचिंब झाडे, पावसाने स्वच्छ धुतलेले रस्ते, मन उल्हसित करणारा गारवा आणि जागोजागी डोंगरांना फुटलेले धबधबे... हे असं कोकण बघायचं तर पावसाळ्यात कोकणात यायलाच हवं. सध्या पर्यटकांना अशीच साद घालतोय तो उक्षीचा धबधबा...

रत्नागिरी तालुक्यातील हा धबधबा कोकण रेल्वे मार्गाच्या शेजारीच असल्यामुळे खूपच प्रसिद्ध झाला आहे. निवळी-गणपतीपुळे मार्गावर नरबे फाट्यावरून उक्षीकडे जायला रस्ता आहे. गाडी घेऊन धबधब्यापर्यंत जाता येत नाही. थोडा वेळ चालावे लागते. पण एकदा धबधबा दिसला की चालण्याचे हे श्रम पूर्णपणे पुसले जातात.
हा धबधबा रेल्वे मार्गाशेजारी असल्याने प्रवासी हमखास दारे खिडक्यांमध्ये येऊन धबधब्याचा आनंद घेतात. गेले काही दिवस सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे या धबधब्याचे तुषार आता रेल्वे प्रवाशांपर्यंत पोहोचत आहेत. म्हणूनच त्याची लोकप्रियता वाढू लागली आहे.

 

Web Title: VEDIO: Eyewash waterfowl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.