भाजपाचे दोन मंत्री ‘मातोश्री’वर

By admin | Published: November 28, 2014 02:35 AM2014-11-28T02:35:00+5:302014-11-28T02:35:00+5:30

राज्य सरकारमधील शिवसेनेच्या समावेशाबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी थेट चर्चा करण्याचे आतार्पयत टाळणा:या भाजपाने अखेर आता त्यांच्याशी चर्चा करून ही कोंडी फोडण्याचा निर्णय घेतला.

Two BJP ministers of 'Matoshree' | भाजपाचे दोन मंत्री ‘मातोश्री’वर

भाजपाचे दोन मंत्री ‘मातोश्री’वर

Next
सत्तेच्या वाटाघाटी : आजपासून पुन्हा चर्चेचे गु:हाळ; कोंडी फोडण्याचा प्रय}
मुंबई : राज्य सरकारमधील शिवसेनेच्या समावेशाबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी थेट चर्चा करण्याचे आतार्पयत टाळणा:या भाजपाने अखेर आता त्यांच्याशी चर्चा करून ही कोंडी फोडण्याचा निर्णय घेतला. केंद्रीयमंत्री धर्मेद्र प्रधान व सहकारमंत्री चंद्रकांत पाटील हे शुक्रवारी सायंकाळी ‘मातोश्री’वर जाऊन उद्धव यांच्याशी चर्चा करणार आहेत.
भाजपाच्या कोअर कमिटीची बैठक शुक्रवारी दुपारी मुंबईत होणार आहे. या बैठकीतून प्रस्ताव घेऊन दोन्ही मंत्री शुक्रवारी सायंकाळी मातोश्रीवर ठाकरे यांची भेट घेतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच सांगितले. 
राज्यातील दुष्काळाच्या प्रश्नावर शिवसेनेने आक्रमक भूमिका घेत राज्यपाल सी. विद्यासागर राव यांना निवेदन देण्याकरिता उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ नेले होते. हे शिष्टमंडळ राजभवनावर दाखल होण्यापूर्वी मुख्यमंत्री  फडणवीस यांनी शिवसेनेसोबत शुक्रवारपासून चर्चेला सुरुवात होणार असून, धर्मेद्र प्रधान व चंद्रकांत पाटील यांना चर्चेचे सर्वाधिकार दिले असल्याचे  जाहीर केले. शिवसेनेच्या राजभवनावरील भेटीतील हवा काढून घेण्याकरिता मुख्यमंत्री फडणवीस यांनी ही खेळी खेळली असल्याची चर्चा सुरू झाली होती. मात्र याबाबत शिवसेनेतील सूत्रंकडे विचारणा केली असता मुख्यमंत्री फडणवीस यांनी शिवसेनेबरोबर चर्चा करून हे मत व्यक्त केल्याचे समजते. मुख्यमंत्री फडणवीस यांनी गुरुवारी उद्धव  यांना दूरध्वनी करून शिवसेनेने सरकारमध्ये सहभागी व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. आतार्पयत भाजपाने थेट उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली नाही. मात्र आता अशी थेट चर्चा व्हावी, असे संकेत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून दिले गेल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केल्याचे समजते. 
पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष अमित शहा आणि अर्थमंत्री अरुण जेटली यांचा सहभाग असलेल्या भाजपाच्या कोअर समितीने शिवसेनेला सत्तेत सहभागी करून घेण्याचा तत्त्वत: निर्णय घेतल्यानंतरच मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीरपणो एक पाऊल पुढे टाकले. नवी दिल्लीतील खात्रीलायक सूत्रंच्या मते शिवसेनेला उपमुख्यमंत्रिपद व प्रसंगी महसूल खाते देण्यासही भाजपाची तयारी आहे. शिवसेनेला 1क् मंत्रिपदे देण्यासही भाजपा राजी आहे. अर्थात गृह खाते सोडण्याची भाजपाची अजिबात तयारी नाही. संसदेचे अधिवेशन सुरू असल्याने केंद्रातील ज्येष्ठ नेत्यांना हजर राहता यावे, या दृष्टीने रविवार्पयत महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचा विस्तार व्हावा, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. (विशेष प्रतिनिधी)
 
शिवसेनेला उपमुख्यमंत्रिपद : नवी दिल्लीतील खात्रीलायक सूत्रंच्या मते, शिवसेनेला उपमुख्यमंत्रिपद व प्रसंगी महसूल खाते देण्यासही भाजपाची तयारी आहे. शिवसेनेला 1क् मंत्रिपदे देण्यासही भाजपा राजी आहे. 
 
भाजपाला का पडली सेनेची गरज?
मध्यावधीची भीती 
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अलीकडेच पक्षाच्या शिबिरात राज्यात केव्हाही मध्यावधी निवडणुका होऊ शकतात, असे संकेत दिले. त्यामुळे बेभरवशाच्या राष्ट्रवादीचा पाठिंबा घेण्यापेक्षा शिवसेनेची साथ घेणो उत्तम यावर भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाचे व विशेष करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मतपरिवर्तन झाले.
 
सेनेकडून कोंडी : शिवसेना विरोधी बाकावर बसून कशी आक्रमक होऊ शकते याची चुणूक गेल्या काही दिवसांत भाजपाला दिसली आहे. दुष्काळी दौ:यात उद्धव ठाकरे यांनी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांना चांगलेच लक्ष्य केले. 
 
राष्ट्रवादीमुळे बदनामी : राष्ट्रवादीने दिलेल्या पाठिंब्यामुळे भाजपा व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सोशल मीडियातून जोरदार टीका होत आहे. त्यामुळे सरकारची प्रतिमा दिवसेंदिवस मलिन होत आहे.
 
हिवाळी अधिवेशन : फडणवीस सरकार पहिल्यांदाच नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाला सामोरे जात आहे. राष्ट्रवादीचा पाठिंबा असला, तरी भरवसा नाही. शिवाय, सरकारमधील मंत्री नवखे आहेत. काँग्रेस आणि शिवसेनेसारख्या विरोधकांना एकाचवेळी तोंड द्यायची वेळ आली, तर सरकारच्या नाकीनऊ येऊ शकतात. या सर्व बाबींचा विचार करून शिवसेनेला सत्तेत सहभागी करून घेण्याची गरज भाजपाला वाटू लागली आहे.

 

Web Title: Two BJP ministers of 'Matoshree'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.