भुशी धरणाकडे जाण्यास पर्यटकांना बंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2017 11:20 AM2017-07-22T11:20:09+5:302017-07-22T11:20:09+5:30

भुशी धरणाचा परिसर, सहाराकडे जाणारा रस्ता व पार्किंग सर्वत्र मोठ्या प्रमाणात पाणी भरल्याने धरण परिसरात जाण्यास पर्यटकांना पुर्णतः बंदी घालण्यात आली आहे.

Tourists banned from going to Bhushi dam | भुशी धरणाकडे जाण्यास पर्यटकांना बंदी

भुशी धरणाकडे जाण्यास पर्यटकांना बंदी

googlenewsNext
style="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत 
लोणावळा, दि. 22 -  मागील आठवडा भरापासून लोणावळा परिसरात झालेल्या जोरदार पावसाचा जोर काल रात्रीपासून प्रचंड वाढल्याने भुशी धरणाचा परिसर, सहाराकडे जाणारा रस्ता व पार्किंग सर्वत्र मोठ्या प्रमाणात पाणी भरल्याने धरण परिसरात जाण्यास पर्यटकांना पुर्णतः बंदी घालण्यात आली आहे.
 
लोणावळ्यात मागील 24 तासात 220 मिमी पाऊस झाला. रात्री पासून लोणावळा परिसरात मुसळधार पाऊस कोसळत असल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. लोणावळ्यातील मावळा पुतळा चौक, गुरुद्वारा चौक, भांगरवाडी, नांगरगाव, तुंगार्ली परिसरात रस्त्यावर जवळपास दिड ते दोन फुट पाणी साचल्याने जनजिवन विस्कळीत झाले आहे. इंद्रायणी नदीला सदापुर, वाकसई, डोंगरगाव, कार्ला, मळवली, कामशेत परिसरात पुल आला असून सांगिसे पुल पाण्याखाली गेल्याने आठ गावांचा संपर्क तुटला आहे. 
 
आणखी वाचा 
पुणे शहरातून वाहणाऱ्या मुठा नदीला आला पूर
VIDEO - मुंबईत झाड अंगावर पडून जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू
धनुष तोफेसाठी चिनी पार्ट्सचा पुरवठा, सीबीआयने सुरु केला तपास
 
लोणावळा परिसरात अतिवृष्टीसोबतच शनिवारची सुट्टी एन्जाँय करण्यासाठी पर्यटकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याने वाहतुकीचा देखिल बोजवारा उडाला असून वाहतुक नियंत्रणासाठी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त नेमण्यात आला आहे.
 

Web Title: Tourists banned from going to Bhushi dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.