शिर्डीत वेगवेगळ्या घटनांत तिघांचा मृत्यू मृतांत नाशिकच्या तरुणीचा समावेश

By admin | Published: May 29, 2014 10:14 PM2014-05-29T22:14:51+5:302014-05-29T23:26:14+5:30

गेल्या चोवीस तासात शिर्डीत झालेल्या वेगवेगळ्या तीन घटनांत तिघांचा मृत्यू झाला़ मृतात विष प्राशन केलेल्या प्रेमीयुगुलातील एका तरुणीचा समावेशआहे़

Three people were killed in separate incidents in Shirdi and Nashik was killed | शिर्डीत वेगवेगळ्या घटनांत तिघांचा मृत्यू मृतांत नाशिकच्या तरुणीचा समावेश

शिर्डीत वेगवेगळ्या घटनांत तिघांचा मृत्यू मृतांत नाशिकच्या तरुणीचा समावेश

Next

शिर्डी : गेल्या चोवीस तासात शिर्डीत झालेल्या वेगवेगळ्या तीन घटनांत तिघांचा मृत्यू झाला़ मृतात विष प्राशन केलेल्या प्रेमीयुगुलातील एका तरुणीचा समावेशआहे़
बुधवारी सायंकाळी पिंपळवाडी रोडलगत कारभारी सोमा जगताप या पासष्ट वर्षीय वृद्धाचा मृतदेह आढळून आला़जगताप हे कल्याण येथील रहिवाशी असून ते शिर्डीत आपल्या नातलगांकडे आले होते़ अति मद्यपान केल्याने व उन्हात पडून राहिल्याने त्यांचा मृत्यू झाला असावा असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे़
दुसरी घटना बुधवारी रात्री साडेअकराच्या दरम्यान घडली़नाशिक येथील संदीप अश्विन रोकडे व सादीया शेख या दोघांनी घरातून पळून जाऊ न दोन दिवसांपूर्वी लग्न केले होते़ हे दोघे शिर्डीतील हॉटेलात मुक्कामी होते़त्यांनी रात्री विषारी औषध प्राशन केले़यानंतर त्रास सुरू झाल्याने संदीपने खाली हॉटेलच्या काऊंटरला फोन करुन विष घेतल्याची माहिती दिली़यानंतर हॉटेलच्या कर्मचार्‍यांनी तातडीने पोलिसांना कळवून रूमकडे धाव घेतली़तत्काळ पोहचलेल्या पोलिसांनी या दोघांनाही साईबाबा रूग्णालयात दाखल केले़येथे या घटनेतील तरुणीचा मृत्यू झाला तर तरुणावर उपचार सुरू आहेत़या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक रणजित गलांडे व हेडकॉन्स्टेबल राजगुरू अधिक तपास करत आहेत़
तिसरी घटना गुरूवारी सकाळी घडली़ द्वारकामाई हेल्थ क्लबच्या बाहेर लावण्यात आलेल्या डबल बारला दोर बांधून याच परिसरात राहणार्‍या एकनाथ रामचंद्र उदावंत या पासष्ट वर्षाच्या वृद्धाने गळफास घेतला़ उदावंत यांनी मृत्युपूर्वी दोन चिठ्ठया लिहून ठेवल्या आहेत़ यातील एक चिठ्ठी सिगारेटच्या पाकिटावर असून त्यात आपल्या मृत्यू प्रकरणी हेल्थ क्लब व जागा मालकाला त्रास देऊ नये असे लिहिले आहे़तर दुसरी चिठ्ठी सहा पानांची आहे़ त्यात कौटुंबिक माहिती बरोबरच आपल्या कुटुंबातील व्यक्तींना दहा हंडे सोने सापडले होते़ते आता एका नातलगाकडे असून ते साईबाबांना अर्पण करावे अशी इच्छाही उदावंत यांनी व्यक्त केल्याचा उल्लेख असल्याचे समजते़याप्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक संगीता राऊत अधिक तपास करत आहेत़ (वार्ताहर)

Web Title: Three people were killed in separate incidents in Shirdi and Nashik was killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.