JEE चा निकाल पाहण्यामध्ये तांत्रिक समस्या; वेबसाईट डाऊन

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2019 05:07 PM2019-06-14T17:07:26+5:302019-06-14T17:18:11+5:30

सकाळी 11.30 वाजता निकाल वेबसाईटवर पाहता येणार असल्याचे सांगितले गेले होते.

Technical problems looking at the results of JEE; Website Down | JEE चा निकाल पाहण्यामध्ये तांत्रिक समस्या; वेबसाईट डाऊन

JEE चा निकाल पाहण्यामध्ये तांत्रिक समस्या; वेबसाईट डाऊन

Next

नवी दिल्ली : JEE Advanced Result 2019 या परिक्षेचा निकाल जाहीर झाला असून वेबसाईटवर निकाल पाहण्यामध्ये समस्या निर्माण झाली आहे. सर्व्हर बंद पडल्याने परिक्षार्थींना निकाल पाहता येत नाही आहेत. आयआयटी रुडकी समस्या दुरुस्त करण्याचे काम करत आहे. 


सकाळी 11.30 वाजता निकाल वेबसाईटवर पाहता येणार असल्याचे सांगितले गेले होते. मात्र, अनेक विद्यार्थ्यांनी एकाच वेळ भेट दिल्याने तांत्रिक समस्या उद्भवली आहे. आयआयटी रुडकीने रिझल्ट 4 वाजता पाहता येणार असल्याचे म्हटले होते. सायंकाळी 5 वाजता आयआयटी रुडकीच्या वेबसाईटवर एक लिंक देण्यात आली असून यावर रिझल्ट पाहता येणार आहेत. 

या लिंकवर क्लिक करा  https://josaa.nic.in/Jeeadvanced_results/root/authcandwithdob.aspx

 



काऊन्सिलिंग आणि जागा निश्चितीची प्रक्रिया 19 जून ते 17 जुलै पर्यंत सुरु राहणार आहे. जेईई अॅडव्हान्स 2019 मध्ये पहिले 23 विद्यार्थ्यांना आयआयटीद्वारे प्रवेश दिला जातो. 

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी(IIT) मार्फत घेण्यात येणाऱ्या जेईई अ‍ॅडव्हान्स्ड (JEE Advance 2019) या प्रवेश परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला आहे. या निकालात महाराष्ट्राचा कार्तिकेय गुप्ता देशात पहिला आला आहे. याआधीही कार्तिकेय गुप्ता याने 100 पर्सेटाइल गुण घेत देशातील पहिल्या २० विद्यार्थ्यांमध्ये स्थान मिळवले होते. कार्तिकेय याने यावर्षी बारावीची परीक्षा उत्तीर्ण करत 93.70 टक्के गुण मिळविले होते. 

अशाप्रकारे पाहा (JEE Advanced Results 2019) परीक्षेचा निकाल - 

  • विद्यार्थ्यांनी सर्वात आधी जेईई अ‍ॅडव्हान्स्डच्या अधिकृत वेबसाइटवर www.jeeadv.ac.in जावं 
  • JEE Advanced च्या होमपेजवर जाऊन JEE Advanced Result 2019 च्या लिंकवर क्लिक करा 
  • लिंक ओपन झाल्यानंतर त्याठिकाणी रजिस्ट्रेशन नंबर आणि विचारलेली माहिती नीट भरावी
  • संपूर्ण माहिती भरल्यानंतर तुमचा निकाल (JEE Advanced Result 2019) होमस्क्रीनवर दिसेल 
  • याठिकाणाहून विद्यार्थी आपला निकाल डाऊनलोड करुन प्रिंटही काढू शकतात. 

Web Title: Technical problems looking at the results of JEE; Website Down

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.