तळेगावमध्ये भरदिवसा इसमावर प्राणघातक हल्ला

By admin | Published: April 13, 2017 02:05 PM2017-04-13T14:05:12+5:302017-04-13T14:05:12+5:30

तळेगाव रेल्वे स्टेशन जवळील यशवंतनगर येथे एका तरुणावर दोन जणांनी प्राणघातक हल्ला केला.

In Talegaon, there was a fatal attack on the family day | तळेगावमध्ये भरदिवसा इसमावर प्राणघातक हल्ला

तळेगावमध्ये भरदिवसा इसमावर प्राणघातक हल्ला

Next
>ऑनलाइन लोकमत
पिंपरी-चिंचवड, दि. 13 - तळेगाव रेल्वे स्टेशन जवळील यशवंतनगर येथे एका तरुणावर दोन जणांनी प्राणघातक हल्ला केला.हा हल्ला भरदिवसा वर्दळीच्या ठिकाणी झाला असून शहर परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे. हल्लेखोर फरार झाले आहेत. हा प्रकार गुरूवारी साडेबाराच्या सुमारास तळेगाव स्टेशन  भागात वर्दळीच्या ठिकाणी घडला.
गणेश गायकवाड असे हल्यात गंभीर जखमी झालेल्या इसमाचे नाव आहे. मिळालेल्या  प्राथमिक माहितीनुसार, तळेगाव स्टेशन परिसरातील यशवंतनगरमध्ये एका इसमावर दोन अनोळखी हल्लेखोरांनी हल्ला केला. यामध्ये हा इसम गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हा हल्ला कोणी केला आणि का केला हे अद्याप समजू शकलेले नाही. तळेगाव पोलीस घटनास्थळी रवाना झाले आहेत.

Web Title: In Talegaon, there was a fatal attack on the family day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.