ऑनलाइन लोकमत

भिवंडी( ठाणे),दि. 17 - स्वाइन फ्लूने एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना भिवंडी तालुक्यातील कशेळी गावात घडली आहे. रत्ना भालचंद्र म्हात्रे (वय ४५) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे.

रत्ना यांना एका आठवड्यापासून ताप येत असल्याने उपचारासाठी प्रथम काल्हेर येथील एस.एस. रुग्णालयामध्ये दाखल केले होते. दोन दिवसांच्या उपचारानंतर प्रकृती खालावल्याने अधिक उपचारासाठी ठाण्याच्या ओरिएंट हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. स्वाईन फ्लूने महिलेचा मृत्यू झाल्याच्या घटनेने आरोग्य विभागाचे वाभाडे निघत आहे. स्थानिक नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. यापुर्वी भिवंडी शहरांतील तीन जणांना मुंबईत उपचारासाठी दाखल केल्यानंतर त्यांना स्वाईन फ्लू असल्याचे निष्पन्न झाले.