Special trains for passengers traveling to Konkan for Holi | होळीनिमित्त कोकणात जाणा-या प्रवाशांसाठी विशेष गाड्या
होळीनिमित्त कोकणात जाणा-या प्रवाशांसाठी विशेष गाड्या

मुंबई : होळीनिमित्त कोकणात जाणा-या प्रवाशांसाठी लोकमान्य टिळक ते करमाळी दरम्यान विशेष सुपरफास्ट एक्स्प्रेस चालविण्यात येणार आहेत. २८ फेब्रुवारी ते २ मार्च या दरम्यान या विशेष गाड्या चालविण्यात येणार आहेत.
लोकमान्य टिळक टर्मिनस-करमाळी सुपरफास्ट एक्स्प्रेस गाडी क्रमांक ०२०३५ ही विशेष गाडी २८ फेब्रुवारी रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून रात्री ८.५० ला सुटेल. दुसºया दिवशी पहाटे ५.४० ला करमाळी रेल्वे स्थानकात पोहोचेल. गाडी क्रमांक ०२०३६ ही विशेष गाडी १ मार्च रोजी सकाळी ७.२५ ला करमाळी स्थानकातून सुटेल आणि त्याच दिवशी सायंकाळी ४ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस स्थानकात पोहोचेल. ठाणे, पनवेल, रोहा, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली आणि थिविम रेल्वे स्थानकांमध्ये या गाडीला थांबा देण्यात आला आहे. या विशेष गाड्यांना तीन थ्री टायर एसी, ६ स्लीपर क्लास आणि ४ सामान्य सेकंड क्लासचे डबे जोडण्यात येणार आहेत.
लोकमान्य टिळक टर्मिनस-करमाळी सुपरफास्ट एक्स्प्रेस; गाडी क्रमांक ०२०३७ ही विशेष गाडी १ मार्च रोजी रात्री ८.५० ला लोकमान्य टिळक टर्मिनसहून सुटेल. दुसºया दिवशी पहाटे ५.४० ला करमाळी रेल्वे स्थानकात पोहोचेल. गाडी क्रमांक ०२०३८ ही विशेष गाडी २ मार्च रोजी सकाळी ७.२५ ला करमाळी स्थानकातून सुटेल व त्याच दिवशी सायंकाळी ४ वाजता एलटीटी स्थानकात पोहोचेल. ही गाडी ठाणे, पनवेल, रोहा, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली व थिविम रेल्वे स्थानकांवर थांबेल.


Web Title:  Special trains for passengers traveling to Konkan for Holi
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.