तर साध्वी प्रज्ञाला मुक्त करा

By admin | Published: September 6, 2015 02:32 AM2015-09-06T02:32:46+5:302015-09-06T02:32:46+5:30

मालेगाव बॉम्बस्फोटात सहभाग असल्याच्या कारणावरून तुरुंगात असलेली साध्वी प्रज्ञासिंह दोषी असल्यास तिला फासावर चढवावे आणि जर दोषी नसेल तर तिची मुक्तता करावी,

So release Sadhvi Pragya | तर साध्वी प्रज्ञाला मुक्त करा

तर साध्वी प्रज्ञाला मुक्त करा

Next

नाशिक : मालेगाव बॉम्बस्फोटात सहभाग असल्याच्या कारणावरून तुरुंगात असलेली साध्वी प्रज्ञासिंह दोषी असल्यास तिला फासावर चढवावे आणि जर दोषी नसेल तर तिची मुक्तता करावी, अशी मागणी षटदर्शन साधू मंडलाचे राष्ट्रीय अध्यक्ष गरीबदास महाराज यांनी पत्रकार परिषदेत केली.
भाजपा सरकार साधू-महंतांच्या विरोधात आहे, अशी टीकाही त्यांनी केली. बॉम्बस्फोटात सहभाग असल्याचे सिद्ध झाल्यानंतर संशयितांसाठी रात्री दोन वाजता न्यायालये उघडली जातात.
सिने अभिनेता संजय दत्त कारागृहात शिक्षा भोगत असताना त्याला संचित रजेवर सोडले जाते; मग साधू-संतांशी संबंधित असलेल्या
प्रज्ञा सिंहला संचित रजेवर का सोडले जात नाही? भाजपा सरकार केवळ संतांची ढाल बनवून त्यांचा वापर करीत आहे; शिवाय भाजपाचे सरकार हे संतांचे सरकार असल्याचा ढोल पिटविला जात आहे; मात्र प्रत्यक्षात परिस्थिती उलटीच आहे, असे गरीबदास महाराज यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

पंतप्रधान भाजपा सरकार सत्तेत आल्यानंतर आम्ही हे केले, ते केले असे सांगत आहेत. प्रज्ञा सिंह यांच्या बाजूने लढा देण्यासाठी लवकरच सर्व साधू समाज एकत्र येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Web Title: So release Sadhvi Pragya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.