खासदार शेट्टी यांच्या मालमत्तेत दीड कोटींची वाढ, विवरण पत्रांतील माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2019 01:47 PM2019-03-28T13:47:03+5:302019-03-28T14:49:58+5:30

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांच्या मालमत्तेत गेल्या पाच वर्षांत १ कोटी ५२ लाख ६० हजार २६३ रुपयांची वाढ झाली आहे. शेट्टी यांनी लोकसभा हातकणंगले मतदार संघातून निवडणूकीचा उमेदवारी अर्ज गुरुवारी भरला त्यामध्ये त्यांनी सादर केलेल्या विवरण पत्रांत ही माहिती दिली आहे. त्यांची २०१४ ला एकूण मालमत्ता ८३ लाख ८७ हजार ७० होती ती आता २०१९ ला २ कोटी ३६ लाख ४७ हजार ३३३ इतकी झाली आहे.

Shetti's assets increase by 1.5 crores, details of the statement | खासदार शेट्टी यांच्या मालमत्तेत दीड कोटींची वाढ, विवरण पत्रांतील माहिती

खासदार शेट्टी यांच्या मालमत्तेत दीड कोटींची वाढ, विवरण पत्रांतील माहिती

Next
ठळक मुद्दे खासदार शेट्टी यांच्या मालमत्तेत दीड कोटींची वाढविवरण पत्रांतील माहिती, पाच वर्षात कोणतेही नवी मालमत्ता खरेदी नाही

विश्र्वास पाटील

कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांच्या मालमत्तेत गेल्या पाच वर्षांत १ कोटी ५२ लाख ६० हजार २६३ रुपयांची वाढ झाली आहे. शेट्टी यांनी लोकसभा हातकणंगले मतदार संघातून निवडणूकीचा उमेदवारी अर्ज गुरुवारी भरला त्यामध्ये त्यांनी सादर केलेल्या विवरण पत्रांत ही माहिती दिली आहे. त्यांची २०१४ ला एकूण मालमत्ता ८३ लाख ८७ हजार ७० होती ती आता २०१९ ला २ कोटी ३६ लाख ४७ हजार ३३३ इतकी झाली आहे.

टक्केवारीचा विचार करता त्यांच्या मालमत्तेत तिप्पट वाढ झाली आहे. या पाच वर्षांत त्यांनी कोणतीही मालमत्ता, शेतजमिन विकत घेतलेली नाही. जुन्याच मालमत्तेची किंमत वाढल्याने त्यांच्या मालमत्तेत वाढ झाल्याचे विवरण पत्रात दिसते.

मालमत्ता वाढण्याची त्यांनी स्वत:हून कारणे दिली आहेत त्यामध्ये १) मुंबई येथील म्हाडाच्या फ्लॅटची किंमत २०१४ ला ४५ लाख होती, तो विकल्यावर त्याची किंमत १ कोटी ४३ लाख रुपये मिळाली. त्यामध्येच ९८ लाख रुपये जास्त मिळाले. २) गेल्या पाच वर्षात कोणतीही जमिन खरेदी नाही परंतू २०१४ पेक्षा सरकारी मुल्यांकनात वाढ झाल्याने जमिनीची किंमत १० लाख ७० हजार इतकी वाढली ३) घर बांधकामासाठी लोकवर्गणीतून २२ लाख रुपये जमा झाले. ४) शासकीय मानधन व विविध समित्यांचे सदस्य म्हणून काम करताना मिळालेल्या भत्यांमध्ये वाढ झाली.

) विवरण पत्रांतील पाच वर्षांतील उत्पन्नाचे तपशील : २०१४-१५ ते २०१८-१९ एकूण
१)शासकीय मानधन : १ कोटी ३२ लाख २ कोटी ७७ लाख ००८ ७ कोटी ३५ लाख ७००८
२)शासकीय भत्ता : ३ कोटी १० लाख ३९२२ १ कोटी १४ लाख ५४६४ ११ कोटी १४ लाख १९२१
३) शेती उत्पन्न : १२ लाख ९१२ ३२ लाख ५००० १ कोटी १० लाख ८१५५
४) मुंबई फ्लॅटचे भाडे : ३ लाख ३६ हजार (विक्री केल्याने भाडे नाही) १ कोटी १२ लाख १०००
एकूण उत्पन्न ४ कोटी ८८ लाख ८३४ ३ कोटी ५४ लाख ७४७२ २ कोटी ७२ लाख ८०८४

 ब) मालमत्ता तपशील २०१४ २०१९

१) रोख शिल्लक - १७ हजार २७ हजार
२) बँक शिल्लक - १ कोटी ३२०८ १ कोटी ४० लाख ७४०५ ३) शेअर्स - १२ लाख ३५० २३ लाख ३२५०
४) विमा रक्कम - ७ लाख ४० हजार ६६४ १९ लाख २४ हजार १९७
५) वाहन - १४ लाख ८० हजार १५ लाख ४७ हजार ७००
६) सोने-जिन्नस - ३ लाख ३० हजार ५ लाख ५८ हजार ७९०
७) शेत जमीन - १७ लाख २७ लाख ७० हजार २५०
८)म्हाडा फ्लॅट - ४५ लाख
९) गुंतवणूक - स्वाभिमानी दूध - ०० २५ लाख ९० हजार
१०)गुंतवणूक - स्वाभिमानी एमआयडीसी-०० ५३ लाख ६९ हजार
११) इतर गुंतवणूक : ०० ५ लाख ३० हजार
१२) घर बांधकाम : ०० ७४ लाख ६३ हजार ८००
१३) कर्जे : १ कोटी ५० लाख ४१५२ ७ कोटी ७४ लाख ०५९

एकूण : ८३ लाख ८४ हजार ०७० २ कोटी ३६ लाख ४७ हजार ३३३

रोख अवघे २७ हजार

महाराष्ट्रातील अनेक खासदार असे आहेत की त्यांच्या पँटचा साधा एक खिसा झाडला तरी त्यातून ५-५० हजार रुपये सहज पडतात. शेट्टी यांच्या बँक खात्यावर मात्र आजची रोख शिल्लक २७ हजार इतकीच आहे.

पत्नी व मुलाच्या नांवावरील संपत्ती

खासदार शेट्टी यांच्या पत्नी संगीता यांच्या नांवावर अवघी ३ हजार २४२ व मुलग्याच्या नावांवर १३ हजार ५० रुपयांची बँक शिल्लक आहे. मुलग्याच्या नांवावर २ हजारचे शेअर्स आहेत. पत्नीचा विमा ७९ हजार १६० तर मुलग्याच्या ३ लाख ८० हजार ४०८ चा विमा आहे.

मुलग्याकडे ९० हजाराचे वाहन आहे. त्यांची पत्नी कोणतेही वाहन वापरत नाही. पत्नीकडे ३ लाख ९४ हजार ४४० रुपयांचे तर मुलग्याकडे ३२ हजार ८७० रुपयांचे सोन्याचे दागिने आहेत. प्रस्थापित राजकारणी व त्यांच्या बायकामुलांच्या नावांवर कोट्यवधी रुपयांची मालमत्ता असते त्या तुलनेत शेट्टी यांचे कुटुंबीय अगदीच सर्वसामान्य असल्याचे दिसते.

Web Title: Shetti's assets increase by 1.5 crores, details of the statement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.