राष्ट्रवादीची आजची सुनावणी संपली; विधानसभा अध्यक्षांनी नवे वेळापत्रक जाहीर केले

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2024 01:06 PM2024-01-20T13:06:20+5:302024-01-20T13:06:45+5:30

राष्ट्रवादीच्या आमदारांच्या अपात्रतेचा निकाल लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. अध्यक्षांनी सुनावणीचे नवीन वेळापत्रक जाहीर केले आहे.

Sharad pawar vs Ajit pawar: NCP's hearing ends today; The Assembly Speaker Rahul narvekar will announce the new schedule | राष्ट्रवादीची आजची सुनावणी संपली; विधानसभा अध्यक्षांनी नवे वेळापत्रक जाहीर केले

राष्ट्रवादीची आजची सुनावणी संपली; विधानसभा अध्यक्षांनी नवे वेळापत्रक जाहीर केले

शिवसेनेचा आमदार अपात्रता आणि पक्ष कोणाचा याचा निकाल लागल्यानंतर राज्याला राष्ट्रवादीच्या सुनावण्यांची उत्सुकता लागली आहे. निकाल देण्यासाठी अवघे १० दिवसच शिल्लक राहिलेले असताना विधानसभवनातून मोठी अपडेट येत आहे. राष्ट्रवादीची दोन्ही गटांची आजची सुनावणी संपली आहे. अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी वेळ वाढविण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. 

राष्ट्रवादीच्या आमदारांच्या अपात्रतेचा निकाल लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. अध्यक्ष सुनावणीचे नवीन वेळापत्रक जाहीर करणार आहेत. यासाठी ते दोन्ही गटाची परवानगी घेणार आहेत, तसा प्रस्ताव ते सर्वोच्च न्यायालयात देणार आहेत. असे झाले तर राष्ट्रवादीतील वादावर निकाल येण्यास फेब्रुवारीचा मध्यावधी उलटू शकतो.

आजच्या सुनावणीवेळी नव्या वेळापत्रकाबाबत चर्चा झाली. दोन्ही गटांना बाजू योग्य पद्धतीने मांडायची असेल तर वेळ देणे गरजेचे आहे. यासाठी वेळापत्रकात बदल करावा लागेल, असे मत अध्यक्षांनी मांडले आहे. सुनावणी, युक्तीवाद, प्रतिवाद यासाठी वेळ कमी देण्यात आला आहे. यावर अध्यक्ष आणि दोन्ही पवार गटांत समझोता झाला आहे. 

उद्या रविवार, २२ जानेवारीला राम मंदिराचे लोकार्पण असल्याने पुढील सुनावणी २३ जानेवारीला होणार आहे. २४ जानेवारीला उर्वरित चार जणांची उलट तपासणी, २५ जानेवारीला दोन साक्षीदारांची उलट साक्ष नोंदविली जाणार आहे. २९ आणि ३० जानेवारीला दोन्ही गट आपली अंतिम बाजू मांडतील. 31 जानेवारीला सुनावणी संपविली जाईल आणि त्यापुढे निकाल देण्यासाठी शिवसेनेप्रमाणेच १० ते १५ दिवसांचा वेळ वाढवून देण्याची मागणी करण्यात येणार आहे. 

जयंत पाटलांचा आरोप...

अजित पवार गटाकडून मुदत वाढ मागितली गेली. आमच्या वकिलांनी त्यांना विरोध केला. पण अध्यक्षांनी वेळ मागितला. मला वाटले आज आमची साक्ष होईल. पण आता 23 तारीख दिली आहे. अनिल पाटील हेच 2019 मध्ये आमच्या पक्षात आले. आमचा पक्ष कसा चालतो हे त्यांना माहीत नाही, असे जयंत पाटील म्हणाले.

Web Title: Sharad pawar vs Ajit pawar: NCP's hearing ends today; The Assembly Speaker Rahul narvekar will announce the new schedule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.