राज यापुढेही माझा प्रेक्षक राहील, नाना पाटेकरांचा निर्वाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 03:14 AM2018-01-23T03:14:46+5:302018-01-23T03:14:59+5:30

राजकीय मंच आणि कलाकारांचा मंच वेगळा असतो. फेरीवाल्यांविषयी मला जे वाटते ते मी त्या वेळी राज ठाकरेंना बोललो.

Raj will continue to be my audience, Nana Patekar's Nirvala | राज यापुढेही माझा प्रेक्षक राहील, नाना पाटेकरांचा निर्वाळा

राज यापुढेही माझा प्रेक्षक राहील, नाना पाटेकरांचा निर्वाळा

googlenewsNext

पुणे : राजकीय मंच आणि कलाकारांचा मंच वेगळा असतो. फेरीवाल्यांविषयी मला जे वाटते ते मी त्या वेळी राज ठाकरेंना बोललो. आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत. त्यामुळे राज माझा कालही प्रेक्षक होता आणि यापुढेही राहील, अशा शब्दांत अभिनेते नाना पाटेकर याने राज ठाकरे यांच्याशी असलेल्या वादावर सोमवारी पडदा टाकला. राजकारणात जाणार नसलो तरी नट म्हणून सतत व्यक्त होत राहीन, असेही नाना म्हणाला.
पत्रकारांशी बोलताना नाना म्हणाला, त्या वेळेस मी आपलेपणाच्या भावनेतूनच बोललो होतो. थोडी कुरबूर होत असतेच. त्या वेळचा विषय तेव्हाच सोडून द्यायचा असतो. त्यामुळे ते माझा आगामी चित्रपट नक्की पाहतील. मी कुठल्याही राजकीय पक्षात जाणार नाही. त्यातूनही समजा गेलोच तर पक्षप्रमुखालाच शिव्या घालत आठवडाभरात सर्व पक्ष फिरून घरी बसेन. आज समाजात जातीय तेढ निर्माण केली जात आहे. ती सोडविण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. यामागे वाढती लोकसंख्या हे मूळ कारण आहे. लोकांनी माझी
जात पाहून माझ्या अभिनयावर प्रेम केले नाही. प्रत्येकाच्या मनगटामध्ये जात आहे. सर्वांनी एकत्र येऊन समाजाचा स्तर वाढविला पाहिजे, अशी अपेक्षाही नानाने व्यक्त केली.
प्रतिसेन्सॉर नको
‘पद्मावत’ चित्रपटाबाबत सुरू असलेल्या वादाबाबत बोलताना नाना म्हणाला, चित्रपटाला एकदा सेन्सॉरने मान्यता दिल्यावर त्यावर प्रतिसेन्सॉर नसावा. आपला विरोध हा आपल्यापुरता मर्यादित ठेवावा. तरीही चित्रपट हे प्रभावी माध्यम असल्यामुळे त्यावर सेन्सॉर हवाच, असेही पाटेकर यांनी सांगितले.

Web Title: Raj will continue to be my audience, Nana Patekar's Nirvala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.