राज्यपालांच्या हस्ते शौर्यपदके प्रदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2018 05:07 AM2018-03-28T05:07:23+5:302018-03-28T05:07:23+5:30

पोलीस दलात उल्लेखनीय सेवा बजावल्याबद्दल राष्ट्रपतींकडून जाहीर झालेल्या ‘राष्ट्रपती पोलीस शौर्यपदक’ व ‘पोलीस शौर्यपदक’, उल्लेखनीय सेवेबद्दल राष्ट्रपती पोलीस पदक आणि गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल पोलीस पदकांचे राज्यपाल चे. विद्यासागर राव यांच्या हस्ते मंगळवारी वितरण झाले.

Providing gallantry at the hands of the Governor | राज्यपालांच्या हस्ते शौर्यपदके प्रदान

राज्यपालांच्या हस्ते शौर्यपदके प्रदान

Next

मुंबई, : पोलीस दलात उल्लेखनीय सेवा बजावल्याबद्दल राष्ट्रपतींकडून जाहीर झालेल्या ‘राष्ट्रपती पोलीस शौर्यपदक’ व ‘पोलीस शौर्यपदक’, उल्लेखनीय सेवेबद्दल राष्ट्रपती पोलीस पदक आणि गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल पोलीस पदकांचे राज्यपाल चे. विद्यासागर राव यांच्या हस्ते मंगळवारी वितरण झाले.
पोलीस पदक वितरणाचा ‘अलंकरण समारंभ नरिमन पाँईंट येथील टाटा थिएटर येथे झाला. यावेळी गृह राज्यमंत्री (ग्रामीण) दीपक केसरकर, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव सुधीर श्रीवास्तव,पोलीस महासंचालक सतीश माथूर, मुंबईचे पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी, पुरस्कार प्राप्त पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय उपस्थित होते. यावेळी १३८ पोलीस अधिकारी आणि अंमलदाराना पुरस्कार प्रदान करण्यात आला. बृहन्मुंबईचे सहायक पोलीस उप निरीक्षक वसंत राजाराम सारंग, ठाणे शहराचे सहायक पोलीस उप निरीक्षक मोतीलाल दगडू पाटील यांना पोलीस पदक देण्यात आले.

पोलीस पदक प्राप्त अधिकारी कर्मचारी : सिडकोचे दक्षता अधिकारी अपर पोलीस महासंचालक विनय महादेवराव कारगांवकर, पश्चिम प्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त डॉ.छेरिंग दोरजे, बृहन्मुंबईचे सेवानिवृत्त पोलीस उपआयुक्त संजय वासुदेव जांभुळकर, सशस्त्र पोलीस ताडदेवचे सेवानिवृत्त पोलीस उप आयुक्त श्रीप्रकाश मारुती वाघमारे, मंत्रालय सुरक्षाचे सेवानिवृत्त पोलीस उपआयुक्त शांतीलाल अर्जुन भामरे, पालघरचे सेवानिवृत्त अपर पोलीस अधीक्षक भगवान गोपाजी यशोद, ठाणे शहराचे पोलीस उपआयुक्त डॉ.संजय हिंदुराव शिंदे, गुन्हे शाखा अंमलबजावणीचे पोलीस उप आयुक्त राजेंद्र गणपत दाभाडे,दक्षताचे मुख्य संपादक सहायक पोलीस उप महानिरीक्षक यशवंत नामदेव व्हटकर,बिनतारी संदेश विभागाचे पोलीस उपआयुक्त बाळकृष्ण मोतीराम यादव, राज्य गुप्तवार्ता विभागाचे सहायक आयुक्त सुरेखा प्रताप दुग्गे, नवी मुंबईचे सहायक आयुक्त नितीन चंपतराव कौसडीकर, नवी मुंबईचे वरिष्ठ निरीक्षक सुनिल बाजारे, रायगडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावता शिंदे, बृहन्मुंबईचे वरिष्ठ निरीक्षक सर्वश्री बृहन्मुंबईचे निरीक्षक सुभाष दगडखैरे, राज्य राखीव पोलीस दलाच्या मुंबईच्या गट क्रंमाक ८ चे पोलीस निरीक्षक सतीश क्षिरसागर, बृहन्मुंबईचे सहायक निरीक्षक फिरोज पटेल,बृहन्मुंबईचे सेवानिवृत्त उप निरीक्षक विष्णू त्रिबंकराव बडे, बृहन्मुंबईचे उप निरीक्षक सर्वश्री सखाराम दत्तु रेडेकर, राजन मांजरेकर, एकनाथ केसरकर, बाळासाहेब श्रीपती देसाई.

राष्टÑपती शौर्यपदक : राष्ट्रपती पोलीस शौर्यपदक हे राष्ट्रपती पोलीस शौर्यपदक दहशतवाद विरोधी पथकाचे अपर पोलीस महासंचालक अतुलचंद्र मधुकर कुलकर्णी,नियोजन व समन्वयचे अपर पोलीस महासंचालक व्ही.व्ही.लक्ष्मीनारायण, विक्रीकर विभाग, दक्षता अधिकारी येथील अपर पोलीस महासंचालक कुलवंत कुमार सारंगल, बृहन्मुंबईचे सेवानिवृत्त सहायक पोलीस आयुक्त शशिकांत दत्तात्रय सुर्वे, वांद्रे विभागाचे सहायक पोलीस आयुक्त संजय लक्ष्मण कदम.

Web Title: Providing gallantry at the hands of the Governor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.